Gauri Ganpati Visarjan Quotes: गौरी गणपती विसर्जनाला 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत बाप्पाला निरोप देण्यासाठी खास Images, Photos!
गणेशोत्सवाच्या काळात घराघरात मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गौरी-गणपती पूजनाची सांगता विसर्जनाने होते.
गणपती बाप्पा आणि गौराईंच्या स्वागतानंतर आता बघता बघता त्यांच्या विसर्जनाची वेळ ठेपली आहे. आज 19 सप्टेंबरला घरगुती गौरी-गणपतींचं विसर्जन (Gauri Ganpati Visarjan) होणार आहे. यंदा सहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पा आपल्या घरी जायला निघाले आहेत.मग अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देताना पुन्हा वर्षी लवकर येण्याचं वचन घेत त्याचं विसर्जन करा.
गौरी आणि गणपती या दोन्ही देवतांचे विसर्जन हे सृष्टीचक्राचे प्रतीक मानले जाते. निर्मिती आणि विसर्जन हे निसर्गाचेच नियम आहेत, याची जाणीव या विधीतून करून दिली जाते. तसेच, मूर्ती मातीच्या असल्याने त्यांचे पाण्यात विसर्जन करणे ही पर्यावरणपूरक परंपरा मानली जाते.
गौरी गणपती विसर्जन कोट्स
अलीकडच्या काळात नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येते. शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढत असून, नागरिकांनाही घरगुती विसर्जनासाठी बादलीत किंवा टबमध्ये मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन केले जाते.