Diwali 2019: सावधान! अशा मंडळींसाठी दिवाळी फारशी सुखकारक ठरणार नाही
इतकेच नव्हे तर, अशा अतिरंजीतपणे दिवाळी साजरी केल्यामुळे इतरांचीही दिवाळी असमाधानकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहा यंदाची दिवाळी कोणासाठी सुखकारक नसेल.
Eco Friendly Diwali 2019: दिवाळी हा लक्ष लक्ष दिव्यांचा सण. जो आनंद, उत्साह आणि प्रेमाने केवळ भारतच नव्हे तर, जगभरातीलही विविध ठिकाणी साजरा केला जातो. भारतात मात्र हा सण साजरा करण्याच्या पद्धती काही वेगळ्याच. दिवळी फराळ, दिवाळी अंक आणि दिवाळी पहाट यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमांचा आनंद घेत दिवाळी साजरी करण्याची मजा काही औरच. पण, हे सर्व करत असताना फटाके, आकाशकंदील, गृहसजावट हेसुद्धा तितकेच नेत्रदीपक असते. अशा वेळी सर्वांनाच असे वाटते की, आपली दिवाळी यंदा झकास चालली आहे. पण, तुम्हीही असा विचार करत असाल तर सावधान! जी मंडळी केवळ व्यक्तीगत स्वार्थासाठी किंवा व्यक्तिगत आनंदासाठी अतिरंजीतपणे दिवाळी साजरी करतील त्यांच्यासाठी ही दिवाळी फारशी सुखकारक ठरणार नाही. इतकेच नव्हे तर, अशा अतिरंजीतपणे दिवाळी साजरी केल्यामुळे इतरांचीही दिवाळी असमाधानकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहा यंदाची दिवाळी कोणासाठी सुखकारक नसेल.
फटाके फोडून ध्वनिप्रदूषण करणारे
दिवळी आणि फटाके यांचे गेल्या अनेक वर्षांचे नाते आहे. हे नाते जपत असताना अनेक मंडळी अतिरंजीतपणा करतात. इतका की ज्याचा त्यांना स्वत:ला आणि इतरांनाही त्रास होतो. मोठ्या आवाजाचे तसेच, अधिक शक्तीशाली फटाके फोडल्याने ध्वनिप्रदूषण तर होतेच परंतू वायूप्रदुषणही मोठ्या प्रमाणावर होते. फटाक्यांमध्ये असलेल्या रसायनांमुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात. त्यात फटाके फोडण्याचे ठिकाण जर रुग्णालयं, शाळा धार्मिक स्थळं आदिंपासून जवळ असेल, तर बालकं, मुलं आणि वृद्ध तसेच रुग्णांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे अशा मंडळींना दिवाळी आनंदाची ठरण्यापेक्षा असमाधानकारक ठरण्याचीच अधिक शक्यता असते. (हेही वाचा, Eco Friendly Diwali 2019: आकाश कंदील, फटाके, दिवाळी खरेदी, दिव्यांच्या उत्साह, लक्ष्मी पूजन, भाऊबीज यांसोबत साजरी करा इकोफ्रेंडली दिवाळी)
कचरा करणारे लोक
दिवाळी आणि खरेदी यांचेही गेल्या अनेक वर्षांचे परंपरागत नाते. त्यामुळे दिवाळीत खरेदीवर भलताच फर पाहायला मिळतो. अशा वेळी कोणतीही वस्तू खरेदी करताना ती पर्यावरणाला बाधा आणणारी तर नाही ना? याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जसे की, वस्तू खरेदी करताना पॅस्टिक पिशवीचा आग्रह न धरता कापडी पिशवी वापरणे. खरेदी केलेल्या वस्तूंची वेष्टनं खास करुन ही वेष्टनं जर प्लॅस्टिकची असतील तर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पण, ही वेष्टने सार्वजनिक ठिकाणी टाकून प्रदुषण वाढवणाऱ्या लोकांसाठीही ही दिवाळी असमाधानकारक ठरु शकते. कारण, असे करणारांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्लॅस्टिक पिशव्या बाळगणाऱ्यांनी अधिक सावध असणे गरजेचे आहे.
अन्नपदार्थ टाकून देणारे लोक
जागतीक भूक सूचकांकामध्ये भारताचे नाव सुरुवातीच्याच काही क्रमावारीत आहे. त्यामुळे भारतासारख्या देशाला भूक या विषय नवा नाही. भारतातील कोट्यवधी लोक एक वेळ किंवा अनेकदा दोन वेळ उपाशी झोपतात. दुसऱ्या बाजूला असेही काही लोक आहेत, जे अन्नपदार्थ चक्क वाया घालवतात. खास करुन दिवाळी सणात खाद्यपदार्थ आणि गोडधोडाची चंगळ असते. अशा वेळी अनेक लोक दिवाळी फराळ, शिल्लक राहिलेले अन्न चक्क फेकून देतात. असे करण्याऐवजी ते एखाद्या गरजूला दिल्यास त्याची भूक भागेल. त्यामुळे तुम्हीही या दिवाळीत अन्नपदार्थ फेकून देत असाल तर, तुम्ही कितीही आनंद साजरा केला तरी, एका अर्थाने तुमची दिवाळी ही असमाधानकारकच राहण्याची शक्यता आहे.