Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2019: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही गोष्टी
भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर (B. R. Ambedkar) यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे.
Dr. B. R. Ambedkar Jayanti 2019: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर (B. R. Ambedkar) यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी बाबासाहेब यांचा जन्म मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) महू गावात त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार कुटुंबात झाला. तर सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते 14 वे अपत्य होते. Ambedkar Jayanti 2019: ‘आंबेडकर जयंती’ चं सेलिब्रेशन 1928 पासून सुरू झालं; कोणी आणि कशी सुरू केली भीम जयंती?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार
बाबासाहेब हे खरे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे येथील होते. तर भीमराव हे वयाने लहान असल्यामुळे त्यांना कॅम्प दापोली शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे घरच्या घरी काही दिवस भीमराव यांनी अक्षरांची ओळख पटवून घेतली. शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1993 रोजी मुंबई विद्यापीठाची बी.ए. परिक्षा उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी अपृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए. पदवी संपादन करण्याचा मान बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवला. त्यानंतर बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्यात येणार होते. तर बाबासाहेब यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहत बडोदा संस्थानच्या वतीने फक्त चार विद्यार्थ्यांची निवड केली होती खरी पण त्यात बाबासाहेबांचे नाव पुढे होते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून बाबासाहेबांनी अभ्यासासाठी प्रमुख विषय म्हणून समाजशास्र, इतिहास, राज्यशास्र, मानववंशशास्र आणि तत्वज्ञान या विषयांची निवड केली.
ज्ञानसंपन्नतेच्या शक्तीमुळे व्यक्ती, समाज, राज्य आणि राष्ट्र महान बनते याची जाणीव बाबासाहेबांना त्यांच्या वाचनातून आणि लेखनातून कळले होते. त्यामुळे 18-18 तास सातत्याने अभ्यास करुन बाबासाहेबांनी सामाजाला न्याय देण्यासाठी तळागाळातील सर्वसामान्य माणसाला जागे केले. प्रत्येक व्यक्तीला त्याचा आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता आणि सामर्थ्याची जाणीव करुन दिली. लोकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करत हक्काने लढण्यास शिकवले. यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करुन समता आणि न्याय समाजात निर्माण केले. बाबासाहेबांच्या अथांग परिश्रमामुळे भारताच्या नव्या उभारणीचे ते एक महान वैभव बनले होते.
जगातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी लोकशाही पद्धतीचा स्विकार केला. त्यासाठी एक व्यक्ती,एक मत, एक मूल्य आणि एक किंमत हा सिद्धांत दिला. परंतु राजकीय लोकशाही असली तरीही त्याचे रुपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत व्हावे असे त्यांना वाटत होते. असे केल्याने जगापुढे देश टिकेल अन्यथा अडचणीत येईल असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यामुळे जगाला शोभेल आणि भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुविधा आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्राला राज्यघटना दिली.