IPL Auction 2025 Live

Diwali 2018 लक्ष्मी पूजन विशेष : लक्ष्मी पावलं रांगोळीच्या माध्यमातून अशा '7' प्रकारे काढाल तर घरात नक्की प्रवेश करेल लक्ष्मी

लक्ष्मी पाऊल रांगोळी Photo Credit : Youtube

दिवाळी हा भारतीयांचा सगळ्यात मोठा सण आहे. देशा-परदेशात मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. पणत्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, कंदीलांचा झगमगाट या सार्‍यांनी आश्विन अमावस्येची रात्र उजळून निघते. आश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजा केली जाते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि पैसा नांदत रहावा याकरिता प्रार्थना केली जाते. लक्ष्मी पूजनामध्ये रांगोळीदेखील महत्त्वाची असते.  लक्ष्मी पूजन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता ? लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी कशी कराल पूजा ?

घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते सोबतच दारात रांगोळी आणि दिवे लावले जातात. नेहमीच्या रांगोळीसोबतच तांदळाच्या पीठाने किंवा रांगोळीच्या मदतीने लक्ष्मीची पावलं काढली जातात. मग तुम्हांलाही यंदा नेमकी ही लक्ष्मीची पावलं कशी काढायची हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा

लक्ष्मीची पावलं ही तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि पैसा येत असल्याच्या प्रतिकात्मक  स्वरूपात काढली जातात.  आजकाल वाढत्या टेक्नॉलॉजीच्या प्रभावामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या पद्धतीने शिकणं सोप्प झालं आहे. तुम्हांला रांगोळी कशी काढायची हे शिकायचं असेल तर स्मार्टफोनवर काही अ‍ॅप्सदेखील मदत करतात.  Diwali 2018 : सहज सोप्या दिवाळी रांगोळ्यांसाठी मदत करतील ही '4' टॉप अ‍ॅप्स  मग यंदा तुम्ही कोणती आणि कशी रांगोळी काढताय ? हे आमच्यासोबतही शेअर करा. तसेच तुम्हांला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा