Happy Dhanteras Images HD Free Download: धनत्रयोदशी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या दिवाळीतील धनतेरस सणाच्या शुभेच्छा!
घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो.
दिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी (Dhanteras) ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते की, या दिवशी देव धन्वंतरीचा जन्म दिवस पण असतो.तर पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा खास मान असतो.देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेसच्या लोकांचे मानणे आहे की, याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.
धनत्रयोदशीबाबत एक दंतकथा असून त्यानुसार असे म्हटले जाते की, जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. तर यंदाच्या धनत्रयोदशीनिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शुभेच्छा! तसेच व्हॉट्सअॅप स्टिकरच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी खास स्टिकर्ससाठी येथे क्लिक करा.
कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. तसेच धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून घराबाहेर लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो, अशी श्रद्धा आहे.