Dr. APJ Abdul Kalam Birth Anniversary 2019: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे '5' प्रेरणादायी विचार बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!
अब्दुल कलाम यांच्या जयंतीचं औचित्य साधत प्रेरणादायी विचार नक्की शेअर करा. आयुष्याच्या कठीण प्रसंगात पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्यास हे स्फुर्तीदायी विचार नक्की मदत करतील.
APJ Abdul Kalam's Inspiring Quotes: 'मिसाईलमॅन' अशी ओळख असणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांची आज (15 ऑक्टोबर) जयंती आहे. डॉ. कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती आहेत. 2002 साली भारताच्या राष्ट्रपती पदी ते विराजमान झाके मात्र पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर ते पुन्हा कार्यात रूजू झाले. शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवा यांच्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून घेतलं होतं. डॉ. कलाम यांच्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत चैतन्य, नव काही शिकण्याची अअणि शिकवण्याची उर्जा कायम होती. त्यांचं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आजही अनेकांना नैराश्यातून, अपयशातून, अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शक आहेत. म्हणून आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधत डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार नक्की शेअर करा. आयुष्याच्या कठीण प्रसंगात पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्यास हे स्फुर्तीदायी विचार नक्की मदत करतील.
डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे झाला. तिरूचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेज मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहित नसलेल्या 5 आश्चर्यकारक गोष्टी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार
- तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तळपायची तयारी ठेवा. - एपीजे अब्दुल कलाम
- आपल्या प्रत्येकाकडं समान बुद्धिमत्ता नसते, पण ती विकसित करण्याची संधी मात्र सर्वांना समान मिळते. - एपीजे अब्दुल कलाम
- स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात. पण स्वप्नं ती असतात जी तुम्हाला सतत जागं ठेवतात. - एपीजे अब्दुल कलाम
- एखाद्याला हरवणं सोपं असतं पण एखाद्याला जिंकणं कठीण असतं. - एपीजे अब्दुल कलाम
- प्रत्येकाला अडचणी येणं आवश्यक असतं, कारण त्यामुळेच आपल्याला यशाचा आनंद लुटता येऊ शकतो. - एपीजे अब्दुल कलाम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे निधान शिलॉंगमध्ये 2015 साली झाली. आयआयएम शिलॉंगमध्ये भाषण देताना मंचावरच डॉ. कलाम यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. डॉ. कलाम यांचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आज जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीला वंदन करून निराशा झटकून पुन्हा नव्या उमेदीने सज्ज व्हा.