छे..! कुंडलीचं काय घेऊन बसलात; लग्नाआधी करा या ५ मेडिकल टेस्ट

पण, त्याचसोबत या ५ मेडिकल टेस्ट करायला अजिबात विसरू नका. ज्यामुळे भविष्यात होणारा त्रास तुम्हाला आगोदरच कळू शकेल.

(Photo Credits: Pixabay)

मुंबई: काळ कितीही बदलला तरी, लोकांच्या डोक्यावरून पंचांग, कुंडली आणि ग्रह यांचे भूत काही उतरायला तयार नाही. अर्थात, या गोष्टी सांगणारे लोक आहेत तसेच, त्या मानणारेही. पण, असे असले तरी, आपल्याला विज्ञानाची कास सोडता येणार नाही. म्हणूनच तुम्हाला जर पहायचीच असेल तर, कुंडली जरूर पाहा. पण, त्याचसोबत या ५ मेडिकल टेस्ट करायला अजिबात विसरू नका. ज्यामुळे भविष्यात होणारा त्रास तुम्हाला आगोदरच कळू शकेल. तसेच, तो निवारणासाठी पर्यायही शोधता येऊ शकेल. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ५ टेस्ट.....

गर्भाशयाची चाचणी...

लग्नानंतर जर तुम्ही अपत्य जन्माला घालू इच्छित असाल तर, आगोदर गर्भाशयाची टोस्ट जरूर करा. आजकालची बदलती जीवनशैली, करिअरच्या मागे धावताना आयुष्याची होणारी फरफट, ताण-तणाव यातून वाढती व्यसनाधीनता आदी गोष्टींचा परिणाम मुलींच्या गर्भाशयावरही होत असतो. अशा वेळी अनेक मुलींमध्ये अपत्य जन्माला घालण्याची क्षमताच कमी झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही टेस्ट महत्त्वाची आहे.

वंध्यत्व तपासणी

समाजात अनेकदा असे दिसते की, अपत्यप्राप्ती होत नसेल तर, महिलेलाच जबाबदार धरले जाते. जणू काही सर्व दोष तिच्यातच आहे. पण, हे पूर्ण सत्य नाही. बहुतांश वेळा पुरूषामध्येही समस्या आढळून येतात. त्यामुळे पुढे जाऊन अशा गोष्टींमुळे तणाव निर्माण होण्याऐवजी वंध्यत्वाची चाचणी आगोदरच करून घ्या.

एसडीटी टेस्ट (लैंगिक संक्रमित रोग)

विवाहापूर्वी दोन्ही जोडीदारांनी 'सेक्सुअली ट्रांन्समिंटेड डिसीज' (एसडीटी) टेस्ट जरूर करावी. कारण, अशा प्रकरणांमध्ये एकाचा आजार लैंगिक संबंधातून दुसऱ्यालाही होण्याची अधिक शक्यता असते. जे जीवनासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. म्हणूनच ही टेस्ट जरूर करा.

ब्लड डिसऑर्डर टेस्ट

लग्नापूर्वी प्रत्येक महिलेने ही टेस्ट करायलाच हवी. कारण, या टेस्टमूळे माहिती होते की, आपण ब्लड हीमोफीलिया किंवा थॅलोसीमियाग्रस्त तर नाही ना? कारण याचा थेट परिणाम आपल्या अपत्यावर होतो.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif