Govatsa Dwadashi 2019 Date: दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस का आणि कसा साजरा केला जातो?

या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. भारतात विशेषता हिंदु संस्कृतीत गाईला अधिक महत्व दिले जाते. यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवसाला गोवत्स व्दादशी असही म्हटले जाते. या दिवशी दुधभात्या जनावरांची पूजा केली जाते.

Diwali (Photo Credit: Twitter)

Vasubaras 2019 Date and Significance:   भारतात (India) अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. परंतु, दिवाळी (Diwali 2019) हा एकमेक सण आहे, ज्यात पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान, दारात आकाशकंदीलाचा उजेड, लखलख करणाऱ्या दिव्यांनी सजवलेले घर, अंगात नवे कपडे आणि फराळांचा सपाटा, अशा अतिशय आनंददायी वातावरणात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवळी हा सण 4 ते 5 दिवस साजरा केला जातो. दिवळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस (Vasubaras) साजरी केली जाते. यंदा वसूबारस हा सण 25 ऑक्टोबर 2019 दिवशी साजरा केला जाणार आहे. वसूबारस हा सण गोवत्स द्वादशी (Govatsa Dwadashi) म्हणून देखील साजरा केला जातो.   मात्र, वासुबारस साजरी करण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे अनेकजण गोंधळून जातात. अशा लोकांच्या आनंदात भर टाकण्यासाठी खाली दिलेली माहिती फायदेशीर ठरणार आहे. तसेच ही माहिती वसुबारस साजरी करण्याची खास पद्धत जाणून घेण्यात तुमची मदत करणार आहे.

वसूबारस साजरा करण्याची पद्धत 

वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. भारतात विशेषता हिंदु संस्कृतीत गाईला अधिक महत्व दिले जाते. यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवसाला गोवत्स व्दादशी असही म्हटले जाते. या दिवशी दुधभात्या जनावरांची पूजा केली जाते. महत्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांच्या कष्टात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या जनावरांनाही मनापासून पूजले जाते. ज्याप्रकारे पोळा सणाच्या दिवशी शेतात राबणाऱ्या बैलाची पूजा केली जाते. तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी गाय आणि वासराला गोड नैवैद्य खाऊ घालून त्यांचीही पूजा केली जाते. ग्रामीण भागात गोठे स्वच्छ करुन सजवले जातात. काही ठिकाणी या दिवशी शेतात शेणाच्या गवळणी आणि श्रीकृष्णाची मुर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे. त्याचबरोबर कुंकू, फुले वाहून गाय वासराची पूजा केली जाते. या दिवशी काही स्त्रिया उपवास करतात. महत्वाचे म्हणजे. या दिवशी काही स्त्रिया गहू, मूग, दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थही खात नाहीत. हे देखील वाचा- Diwali 2019 Panti Painting: दिवाळीनिमित्त दिव्यांची आरास करण्यासाठी सोप्या ट्रिक्स, 'या' पद्धतीने सजवा तुमची पणती

भारतीय संस्कृतीत पशूधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. आपण पशूंवर अवलंबून असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. भरपूर पक्षुउत्पादनात वाढ होण्यासाठी , कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि सुख लाभावे म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी पुरणपोळी, किंवा ज्वारीची भाकर आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखविला जातो.