Care Tips: मंदिरे, शॉपिंग मॉल्स सुरु झाल्यानंतर तुम्ही तेथे जात असल्यास घरीच 'या' पद्धतीने करा कपडे सॅनिटाइज
त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचा 5.0 टप्पा कायम राहणार आहे. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमात शिथीलता आणत नागरिकांसाठी काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत.
देशभरास कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचा 5.0 टप्पा कायम राहणार आहे. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमात शिथीलता आणत नागरिकांसाठी काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान आज पासून राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळांसह शॉपिंग मॉल्स सु्द्धा सुरु करण्यात येणार आहेत. नागरिकांची या ठिकाणी जाण्यासाठी रेलचेल सुद्धा सुरु झाली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासोबत मास्क लावणे अनिवार्य आहे. परंतु जर तुम्ही आता मंदिरे आणि शॉपिंग मॉल्स सुरु झाल्यानंतर तेथे जाण्याचा विचार करत असल्यास काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बाहेरुन आल्यानंतर तुमचे कपडे कशा पद्धतीने घरीच सॅनिटाइज करु शकता.(धक्कादायक! टक्कल आणि कोविड19 यांच्यामध्ये गहिरे नाते, टकलू व्यक्तींना Coronavirus चा सर्वाधिक धोका असल्याचे रिसर्च मधून खुलासा)
>>जर तुम्ही घराबाहेरुन आल्यास तुमचे कपडे एका वेगळ्या बास्केट मध्ये ठेवा. हे कपडे अन्य धुण्याच्या कपड्यांसोबत एकत्र करु नका. कपडे धुवायचे असल्यास त्यामध्ये अॅन्टिंसेप्टिक लिक्विट किंवा मल्टीयुज हायजीन लिक्विडचा वापर करा. त्यामुळे कपड्यांवर असलेले जंतू दुसऱ्या कपड्यांच्या संपर्कात येण्यास मज्जाव होईल.
>>कपडे धुण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करा. गरम पाण्याचे तापमान जवळजवळ 55-60 डिग्री पर्यंत असू द्या. हे पाण्याचे तापमान तुमच्या कपड्यावरील बॅक्टेरिया काढण्यास मदत करेल. तसेच गरम पाण्यात धुतलेले कपडे अधिक स्वच्छ सुद्धा दिसून येतात. काही वॉशिंग मशीन मध्ये आधीपासूनच पाण्याचे तापमान निवडण्याचे ऑप्शन देण्यात येते. जर हवे असल्यास तुम्ही त्याचा सुद्धा वापर करु शकता.
>>कपडे मशीन मध्ये जर तुम्ही धुतल्यास त्यानंतर ती सॅनिटाइज करण्याचे विसरु नका. तसेच अॅन्टिसेप्टिक लिक्विडचा वापर करत मशीन साफ करा. मशीन साफ करताना सुद्धा काळजी घ्यावी.(कोरोना व्हायरसच्या महारोगापासून बचाव करण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील काही खास टीप्स)
तर वरील काही टीप्स सध्या तुमच्या उपयोगी येतीलच. पण कपडे धुतल्यानंतर ते वाळण्यासाठी योग्य जागा निवडा. तसेच कपड्यांमध्ये ओलावा राहणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्या. सध्या पावसाचे दिवस असल्याने कपडे वाळण्यास वेळ लागत असल्यास ते ड्रायरने वाळवा पण त्यामधील ओलावा जाईल याकेड सुद्धा लक्ष ठेवा. त्यानंतर वाळवलेले कपडे तुम्ही कपाटात घडी करु ठेवू शकता.