Budget 2022 for Education: शिक्षणाबाबत अर्थसंकल्पात काय आहे विशेष? शिक्षण क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' घोषणा

शिक्षकांना अध्यापनाच्या डिजिटल साधनांनी सुसज्ज करण्यासाठी आणि चांगले शैक्षणिक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्तापूर्ण ई-सामग्रीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धात्मक यंत्रणा तयार केली जाईल.

School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Budget 2022 for Education: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी 2022 रोजी लोकसभेत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या वर्षी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी विविध क्षेत्रांप्रमाणेच, सरकारच्या सामाजिक पायाभूत सुविधा, रोजगार आणि मानव विकास विभागांतर्गत येणाऱ्या शिक्षण क्षेत्रासाठीही अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये डिजिटल विद्यापीठाची स्थापना, वन क्लास वन चॅनलचा 200 चॅनलपर्यंत विस्तार, डिजिटल विद्यापीठाची स्थापना, डिजिटल DESH ई-पोर्टलची स्थापना, AICTE द्वारे शहरी नियोजनाशी संबंधित अभ्यासक्रम, वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञानावरील अभ्यासक्रम इत्यादींचा समावेश आहे.

या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राचा उल्लेख करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, कोविड महामारीमुळे शाळा बंद झाल्यामुळे आपल्या मुलांना, विशेषत: या देशातील ग्रामीण आणि मागासवर्गीय वर्गातून आलेल्या मुलांना वाचवावे लागेल. कोविडमुळे खूप समस्या उद्भवत आहे. मुलांनी त्यांच्या शालेय शिक्षणाची दोन वर्षे घरी घालवली आहेत. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या समस्या आणि गरजा आम्हाला समजतात. म्हणूनच, आम्ही पीएम ई-विद्या अंतर्गत आधीच कार्यरत असलेल्या 'वन क्लास, वन टीव्ही चॅनल' या कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा विचार केला आहे. आम्ही आता ते 200 टीव्ही चॅनेल्सपर्यंत वाढवत आहोत. जेणेकरून आपल्या देशातील विद्यार्थ्यांना त्यांचे पूरक शिक्षणही मिळू शकेल. (वाचा - Budget 2022 For Farmers: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2.37 लाख कोटी MSP हस्तांतरित करण्यात येणार, जाणून घ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं)

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा -