State With Highest Number Of Road Accidents: भारतातील 'या' 4 राज्यांमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात; नितीन गडकरी यांनी संसदेत दिली माहिती

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना नितिन गडकरी यांनी सांगितले की, रस्ते अपघातात दरवर्षी 178000 लोकांचा मृत्यू होतो आणि यातील 60 टक्के बळी 18 ते 34 वयोगटातील असतात. अपघातांची संख्या कमी नव्हे तर वाढली आहे. हे मान्य करण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. हे असे एक क्षेत्र आहे जिथे आमच्या विभागाला यश मिळालेले नाही.

State With Highest Number Of Road Accidents: भारतातील 'या' 4 राज्यांमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात; नितीन गडकरी यांनी संसदेत दिली माहिती
Nitin Gadkari (फोटो सौजन्य - X/@Indianinfoguide)

State With Highest Number Of Road Accidents: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातील सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या चार राज्यांची (State With Highest Number Of Road Accidents) नावे उघड केली आहेत. शुक्रवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Parliament Winter Session 2024) बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, रस्ते अपघातात दरवर्षी 178000 लोकांचा मृत्यू होतो आणि यातील 60 टक्के बळी 18 ते 34 वयोगटातील असतात. अपघातांची संख्या कमी नव्हे तर वाढली आहे. हे मान्य करण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. हे असे एक क्षेत्र आहे जिथे आमच्या विभागाला यश मिळालेले नाही.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, दिल्ली हे सर्वात जास्त प्रभावित शहर आहे, जिथे 1,457 हून अधिक मृत्यू झाले आहेत. यानंतर, बंगळुरूमध्ये 915 आणि जयपूरमध्ये 850 मृत्यू झाले आहेत. तथापी, रस्ते अपघातात इतके लोक मृत्युमुखी पडत असतानाही कायद्याचा धाक राहिलेला नसल्याबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी काही लोक हेल्मेट घालत नाहीत, काही लोक सिग्नलचे उल्लंघन करतात, असही नमूद केलं. (हेही वाचा -Nitin Gadkari on PM Offer: 'अनेक वेळा पंतप्रधान होण्याची ऑफर आली' - नितीन गडकरी)

भारतातील सर्वाधिक रस्ते अपघातांची संख्या असेलली राज्य -

  • उत्तर प्रदेश: 23,652
  • तामिळनाडू: 18,347
  • महाराष्ट्र: 15,366
  • मध्य प्रदेश: 13,798

रस्त्यावर ट्रकची पार्किंग रस्ते अपघाताचे कारण -

रस्त्यावर ट्रकचे पार्किंग हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. अनेक ट्रक लेनची शिस्त पाळत नाहीत, अशी नाराजीही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना भारतात बस बॉडी बनवताना आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, बसच्या खिडकीजवळ हातोडा ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. जेणेकरून अपघात झाल्यास या हातोड्याने बसची काच तोडून जीव वाचवणे शक्य होईल. (हेही वाचा:Nitin Gadkari PM Offer: नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ )

भारतातील रस्ते सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलताना लाज वाटते - नितीन गडकरी

जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी जातो. तेव्हा भारतातील रस्ते सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलायला मला लाज वाटते. मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो, असेही यावेळी गडकरी यांनी नमूद केले. काही वर्षांपूर्वी माझा आणि माझ्या कुटुंबाचा मोठा अपघात झाला होता. यानंतर आम्हाला बराच काळ रुग्णालयात राहावे लागले होते. देवाच्या कृपेने मी आणि माझे कुटुंब वाचलो. त्यामुळे मला अपघातांचा वैयक्तिक अनुभव असल्याचंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2024 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).