भाजपच्या कार्यकाळामध्येच बँकांची परिस्थिती वाईट - रघुराम राजन

रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाच्या कार्यकाळात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच भारतातील बँकिंग व्यवस्थेची स्थिती वाईट होती, अशी टीका सीतारामन यांनी केली होती. यावर रघुराम राजन यांनी पलटवार केला आहे.

Raghuram Rajan (Photo Credit - PTI)

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाच्या कार्यकाळात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच भारतातील बँकिंग व्यवस्थेची स्थिती वाईट होती, अशी टीका सीतारामन यांनी केली होती. यावर रघुराम राजन यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसच्या काळात मी फक्त 8 महिने आरबीआयचा गव्हर्नर पदी होतो. तसेच भाजप सरकार असताना 26 महिने आरबीआयचा गव्हर्नर म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळातील सर्वाधिक कालावधीत केंद्रात भाजपचेच सरकार होते, असं प्रतिउत्तर राजन यांनी दिलं आहे.

हेही वाचा - आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचे भूत सरकारच्या डोक्यावर सवार; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची टीका

रघुराम राजन यांनी 5 सप्टेंबर 2013 रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद स्वीकारले होते. त्यानंतर राजन सप्टेंबर 2016 पर्यंत या पदावर कार्यरत होते. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर बुडीत कर्जांच्या फेऱ्यात अडकलेल्या बँकिंग व्यवस्थेला त्यातून बाहेर काढण्याचे काम आपल्या कार्यकाळात सुरू झाले. परंतु, ते कार्यकाळ संपेपर्यंत संपुष्टात आलं नाही, असंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं. भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी आणि विकासदर वाढविण्यासाठी नव्या स्वरुपाच्या आर्थिक सुधारणा करणे गरजेचे आहे, असं सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन बोलत होते. दरम्यान, रघुराम राजन यांनी आपल्याला कोणत्याही राजकीय वादात पडायचे नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - शक्तिकांत दास यांना दिलेले गव्हर्नरपद म्हणजे आर्थिक दहशतवादाची सुरुवात- सामनाच्या अग्रलेखातून टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक बँकांची आर्थिक स्थिती चिंताजनक होण्यास माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि रिजर्व्ह बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन जबाबदरा असल्याचे म्हटले होते. सीतारमण यांनी म्हटले होते की, मनमोहन सिह आणि रघुराम राजन यांचा कार्यकाळ सरकारी बँकांसाठी 'सर्वात वाईट काळ' होता. सीतारमण यांनी कोलंबिया यूनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनेशनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स मध्ये एक व्याख्यान दिले होते. या व्याख्यानात सीतारमण यांनी म्हटले होते की, सार्वजनिक बँकांना नवसंजिवनी देणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. रघुराम राजन हे एक महान विद्वान आहेत. मी त्यांचा आदर करते त्यांना त्या काळात केंद्रीय बँकेत घेतले गेले जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif