SEBI Barred 10 Entities: सेबीची मोठी कारवाई, अब्जाधीश वाडिया कुटुंबावर 2 वर्षांसाठी बंदी; 15.75 कोटींचा दंड

यासोबतच सेबीने 15.75 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सेबीने 45 दिवसांत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.

SEBI (PC - Twitter)

SEBI Barred 10 Entities: शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबी (SEBI) ने बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (Bombay Dyeing and Manufacturing Company Ltd) आणि कंपनीचे प्रवर्तक आणि अब्जाधीश वाडिया कुटुंबावर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या प्रवर्तकांमध्ये नुस्ली एन वाडिया, नेस वाडिया आणि जहांगीर वाडिया यांचा समावेश आहे. यासोबतच सेबीने 15.75 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सेबीने 45 दिवसांत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय वाडिया ग्रुपची कंपनी स्केल सर्व्हिसेस लिमिटेडवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी संचालक डीएस गागरट, एनएच दातनवाला शैलेश कर्णिक, आर चंद्रशेखरन आणि दुर्गेश मेहता यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा - Jharkhand Shocker: झारखंडमधील पश्चिम सिंगभूममध्ये क्रूरतेच्या सर्व सीमा पार; 10 नराधमांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर केला सामूहिक बलात्कार)

सेबीच्या म्हणण्यानुसार, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे ​​आर्थिक तपशील चुकीचे सादर करण्यात आले. SEBI ने माहिती दिली की, काही तक्रारींच्या आधारे, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (BDMCL) च्या प्रकरणांमध्ये 2011-12 ते आर्थिक वर्ष 2018-19 या कालावधीसाठी तपशीलवार तपास करण्यात आला.

SEBI ला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, प्रतिबंधित प्रवर्तक आणि संस्थांनी 2,492.94 कोटी रुपयांच्या विक्रीतून 1,302.20 कोटी रुपयांच्या नफ्यात फेरफार केला आणि BDMCL च्या आर्थिक तपशीलांवर प्रभाव टाकण्यासाठी तो वाढवला.

दरम्यान, सेबीच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी, वाडिया कुटुंबाने बीडीएमसीएलच्या आर्थिक तपशीलांची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देण्यासाठी योजना अंमलात आणण्यात सक्रिय भूमिका बजावली. चुका करूनही ते जाणीवपूर्वक निष्क्रिय राहिले.