tly.com/socially/social-viral/they-broke-the-windows-of-the-train-due-to-not-getting-a-seat-the-video-went-viral-542039.html" title="Viral Video: सीट न मिळाल्याने ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडल्या, व्हिडिओ व्हायरल">Viral Video: सीट न मिळाल्याने ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडल्या, व्हिडिओ व्हायरल
  • Women Group Danced in Delhi Metro: एवढचं पाहायचं राहिलं होतं! दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचा ग्रुप डान्स, पहा व्हायरल व्हिडिओ
  • Woman Enters Delhi Bus Wearing A Bikini: काय सांगता? फक्त बिकिनी घालून महिलेने केला दिल्लीच्या बसमधून प्रवास; व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
  • Close
    Search

    Lockdown: केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा; राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

    देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज जाहीर केले आहे. करोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे.

    राष्ट्रीय Ashwjeet Jagtap|
    Lockdown: केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा; राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

    देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज जाहीर केले आहे. करोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र, या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी निर्मला सितारामन यांनी या पॅकेजची घोषणा केली. केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आपली प्रतिक्रीय नोंदवली आहे. लॉकडॉऊनमध्ये (Lockdown) केंद्र सरकारने घेतलेला निर्णय देशातील हातावर पोट भरणाऱ्या जनतेसाठी अतिशय योग्य आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

    भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देश लॉकडाउनमध्ये जात असल्याची घोषणा केली. यामुळे संपूर्ण जनजom%2Findia%2Frahul-gandhi-welcomes-centres-covid-19-financial-package-114332.html',900, 600)">

    राष्ट्रीय Ashwjeet Jagtap|
    Lockdown: केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा; राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

    देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज जाहीर केले आहे. करोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र, या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी निर्मला सितारामन यांनी या पॅकेजची घोषणा केली. केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आपली प्रतिक्रीय नोंदवली आहे. लॉकडॉऊनमध्ये (Lockdown) केंद्र सरकारने घेतलेला निर्णय देशातील हातावर पोट भरणाऱ्या जनतेसाठी अतिशय योग्य आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

    भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देश लॉकडाउनमध्ये जात असल्याची घोषणा केली. यामुळे संपूर्ण जनजीवन बंदिस्त झाले आहे. असंघटित आणि दररोज काम करून उदरर्निवाह चालवणाऱ्यांचा प्रश्न उपस्थित होत होता. त्यांच्यासह देशातील सर्वच घटकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय राज्यअर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली आहे. या योजने अंतर्गत शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे, असेही त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. हे देखील वाचा- Coronavirus Update: महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 125 वर पोहचली; नागपूर मध्ये आढळला नवा रूग्ण

    राहुल गांधी यांचे ट्वीट- 

    राहुल गांधी काय म्हणाले?

    अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषदेत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारचे कौतुक केले आहे. ‘सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आर्थिक पॅकेज हे योग्य दिशेने टाकण्यात आलेले पहिले पाऊल आहे. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीचे भारतावर ऋण आहे,’ असे राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

    भारतात आतापर्यंत 650 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 42 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 125 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.

    Comments
    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change