POK ला पुन्हा भारतासह जोडण्याचा मोदी सरकारचा पुढील अजेंडा असणार- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
त्यानंतर आता पाक अधिकृत कश्मीरला (POK) भारतासह जोडणे हा मोदी सरकारचा पुढील अजेंडा असणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने (Modi Government) जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवला. त्यानंतर आता पाक अधिकृत कश्मीरला (POK) भारतासह जोडणे हा मोदी सरकारचा पुढील अजेंडा असणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 100 दिवसाच्या अवधीत जम्मू-कश्मीरकडून विशेष राज्याचा दर्जा काढून घेणे आणि पाकिस्तानकडे असलेला पाकव्यात कश्मीर पुन्हा भारताला जोडणे हा मुख्य अजेंडा असणार आहे.
जितेंद्र सिंह यांनी पाकव्यात कश्मीर या मुद्द्यावर असे म्हटले आहे की, हा निर्णय फक्त माझ्या पक्षाचा नसून 1994 मधील पी. वी. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारद्वारे सर्वानुमते करण्यात आलेला विचार आहे. दरम्यान जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावरुन सरकारने त्यांचे राजकीय विचार बदलले आहेत. तसेच पाकिस्तानला पिछाडीवर टाकण्यासाठी पीओके हा अजेंडा पुढे घेऊन येणार आहे.(पाकिस्तानातून आलेल्या 23 नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व)
ANI ट्वीट:
कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान संतप्त झाला होता. तसेच भारताच्या विरोधात कुरघोडी ही सुरु करण्याचा प्रयत्न पाकिस्तान कडून करण्यात येते आहे. मात्र जागाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच आहे. तसेच काही जग भारताने जम्मू-कश्मीर बाबत घेतलेल्या निर्णयामुळे नाखुश होते ते सुद्धा आता या निर्णयाशी सहमत झाले असल्याचे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.