भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार, व्हिडिओ व्हायरल

सोमवारी संध्याकाळी नागदा जिल्ह्यामध्ये प्रचार करण्यास आलेल्या भाजपाच्या आमदाराच्या गळ्यात एका व्यक्तीने फुलांचा हार एवजी चपलांचा हार घातला आहे.

भाजपा आमदार दिलीप शेखावत ( फोटो सौजन्य - ANI )

मध्य प्रदेशात सलग तीन वर्षे भाजपची सत्ता येत आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीत भाजपाला दणका दिला असून त्यांच्यामध्ये नाराजगी दिसून येत आहे. सोमवारी संध्याकाळी नागदा जिल्ह्यामध्ये प्रचार करण्यास आलेल्या भाजपाच्या आमदाराच्या गळ्यात एका व्यक्तीने फुलांचा हार ऐवजी चक्क चपलांचा हार घातला आहे.

खाचरोद मतदारसंघातून भाजपचे आमदार दिलीप शेखावत निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी ते प्रचारासाठी आले असता मतदारांच्या गाठी भेटी घेत होते. मात्र अचानक एका व्यक्तीने समोर येऊन त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातल्याने सुरुवातीला त्यांना काहीच कळले नाही. या घटनेमुळे आमदारांनी गळ्यात चपलांचा हार पाहिल्यावर संतप्त होऊन त्या व्यक्तीला मारहाण करत दोघांमध्ये वादावादी चालू झाली.

मात्र चपलांचा हार घालणाऱ्या वक्तीने भाजपचा आमदारांवर राग व्यक्त करत हा प्रकार केल्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच कमळाचा छापा असलेली टोपी आणि भाजपचे निवडणूक चिन्ह असा त्या माणसाचा पेहराव होता. परंतु भाजप आमदाराला भर प्रचार रॅलीमध्ये हार घालणारी ही व्यक्ती कोण होती हे अजून समोर आले नाही आहे.