अयोध्या निकालाप्रकरणी लाल कृष्ण अडवाणी यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
याच पार्श्वभुमीवर राम मंदिर प्रकरणी आंदोलनात सहभागी होणाऱ्या भाजपचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवानी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्या प्रकरणी आज (9 नोव्हेंबर) सुप्रीम न्यायलयाने ऐतिहासिक निर्णय दिल्याने याचे स्वागत केले जात आहे. याच पार्श्वभुमीवर राम मंदिर प्रकरणी आंदोलनात सहभागी होणाऱ्या भाजपचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवानी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लाल कृष्ण अडवानी (Lal Krishna Advani) यांनी प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, देशातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आज खुप खुश आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर करोडो लोकांच्या भावनांचा सन्मान झाल्याचे ही अडवाणी यांनी म्हटले आहे. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत असून न्यायाधिशांनी मस्जिद बनवण्यासाठी 5 एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
अडवाणी यांनी असे ही म्हटले की, अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधिशांनी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. तसेच राम मंदिर स्थापन करण्याप्रकरणी एकमताने न्यायाधिशांनी जो निर्णय दिला आहे त्याबाबत मी खुश आहे. राम जन्मभूमी बद्दल देशात जे जनआंदोलन झाले तेच आंदोलन आझादीनंतर सर्वात मोठे आंदोलन झाल्याचे दिसून आले. तर मी देवाचे आभार मानतो की मी या ऐतिहासिक निर्णयाचा हिस्सा बनू शकलो.(Ayodhya Verdict: अयोध्या प्रकरणी सुन्नी वफ्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत, पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही)
भारत आणि जगातील बहुतांश नागरिकांच्या मनात रामजन्मभूमीबाबत एक विशेष भावना आहे. राम आणि रामायण, भारताची संस्कृती, सभ्यता यांना फार महत्व दिले जाते. गेल्या काही दशकांपासून करण्यात आलेल्या मोर्च्यांसाठी आज न्यायालयाने सुनावलेला निर्णय उच्चस्थानी आहे. त्यामुळे आता अयोध्या प्रकरणाचा वाद मिटल्यानंतर प्रत्येकाने आपल्या मनातील कटुता बाजूला ठेवत शांति कायम टिकून रहावी याचा प्रयत्न करावा. राम मंदिरच्या आंदोलानाबाबत मी नेहमीच ही गोष्ट सांगितली आहे की, अयोध्येत रामाचे भव्य मंदिर हे एक शानदार राष्ट्र मंदिराची स्थापना करण्यासमान असल्याचे अडवाणी यांनी म्हटले आहे.