Donald Trump India Visit Day 2 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प आणि First Lady मेलेनिया ट्रम्प दोन दिवसीय भारत दौरा संपवून अमेरिकेसाठी रवाना

आज दिल्लीमध्ये डोनाल्ड ट्र्म्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामध्ये बैठक होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये भारत-अमेरिका यांच्यामधील व्यापार संबंधी करारावर चर्चा होणार आहे.

26 Feb, 03:57 (IST)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि First Lady मेलेनिया ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौरा संपवून पुन्हा अमेरिकेला जाण्यासाठी दिल्ली येथील विमानतळावरून रवाना झाले आहेत.

26 Feb, 02:47 (IST)

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प या आज राष्ट्रपती भवनात खास मेजवानीचा आस्वाद घेणार आहेत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पत्नी सविता कोविंद यांच्याकडून या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे, यात ट्रम्प दाम्पत्यासाठी मांसाहारी जेवणाचा बेत केला असून या मेन्यूची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

26 Feb, 01:21 (IST)

डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प काही वेळापूर्वी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत, याठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी ट्रम्प दाम्पत्याचे स्वागत केले आहे, आज याठिकाणी टॅम्प दाम्पत्यासाठी खास मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.

25 Feb, 23:22 (IST)

ईशान्य दिल्ली मध्ये सीएए वरून सुरु असणाऱ्या वादावरून भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे, आम्ही धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोललो. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे अशी त्यांची इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे. त्यांनी यावर खरोखर कठोर परिश्रम केले आहेत. मी वैयक्तिक हल्ल्यांबद्दल ऐकले परंतु मी त्यावर चर्चा केली नाही. हा भारताचा अंतर्गत विषय आहे आणि हा निर्णय सुद्धा भारतावर अवलंबून आहे.

25 Feb, 22:16 (IST)

आज दिल्लीमध्ये बिझनेस लीडर्ससोबत चर्चा करताना डोनाल्ड ट्र्म्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी हे खूप स्पेशल पंतप्रधान आहेत तसेच ते उत्तम काम करत असल्याचं डोनाल्ड ट्र्म्प यांनी म्हटलं आहे.

25 Feb, 21:27 (IST)

कोरोना व्हायरसला नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यंनी दिली असल्याचं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सांगितलं आहे.

25 Feb, 19:46 (IST)

आज मेलानिया ट्र्म्प यांनी दिल्लीच्या सरकारी शाळेत हॅप्पीनेस क्लासला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळेस पारंपारिक नृत्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेत प्रेक्षकांमध्ये थिरकणार्‍या चिमुकल्यांनाही मेलानिया ट्रम्प यांनी दाद दिली. इथे वाचा सविस्तर वृत्त .  

25 Feb, 19:20 (IST)

भारताने आतापर्यंत 3 बिलियन पेक्षा अधिक लष्करी शस्रे खरेदी केली आहेत. त्यामध्ये  भारताने अपाचे आणि MH-60 रेमियो हॅलिकॉप्टरचा त्यात समावेश आहे. तर आता भारत-अमेरिका संयुक्तपणे संरक्षण दलाला अधिक मजबूती देणार आहोत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

25 Feb, 18:51 (IST)

US First Lady मेलानिया ट्र्म्प यांनी आज सर्वोदय को एड सिनियर स्कुलमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी पारंपारिक नृत्य सादर करण्यात आलं आहे. दरम्यान पहिल्या भारत दौर्‍याचा अनुभव सुंदर असल्याचं सांगत त्यांनी भारतीय वेलकमिंग आणि दयाळू असल्याचं म्हटलं आहे.

25 Feb, 18:21 (IST)

हैदाराबाद हाऊस येथे सुरू असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चेमध्ये सहभागी शिष्टमंडळाचे आभार मानले आहेत. तुम्ही कामामध्ये व्यग्र असूनही वेळात वेळ काढून भारतामध्ये आले आहात त्यासाठी आम्ही आभारी आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. तर डोनाल्ड ट्र्म्प यांनी मोटेरा स्टेडियमच्या कार्यक्रमामध्ये जनतेशी संवाद साधताना लोकांचं तुमच्यावर प्रेम असल्याची प्रचिती आली. अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे.

25 Feb, 18:04 (IST)

भारत दौर्‍यावर आलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा हैदराबाद हाऊसमध्ये सुरू केली आहे.

25 Feb, 17:45 (IST)

आज दिल्लीमध्ये ट्र्म्प कुटुंबीयांच्या भारत दौर्‍यातील दुसर्‍या दिवशी US First Lady मेलानिया ट्र्म्प यांनी सर्वोदय को-एड सिनियर सेकंडरी शाळेला भेट दिली आहे. यावेळेस शाळेतील विद्यार्थांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधला आहे.

25 Feb, 17:26 (IST)

आज दिल्लीमध्ये ट्र्म्प कुटुंबीयांच्या भारत दौर्‍यातील दुसर्‍या दिवशी US First Lady मेलानिया ट्र्म्प यांनी सर्वोदय को-एड सिनियर सेकंडरी शाळेला भेट दिली आहे.

25 Feb, 16:43 (IST)

राजघाटावर महात्मा गांधींजीच्या स्मृतिला अभिवादन अर्पण केल्यानंतर ट्रम्प दांपत्य हैदराबाद हाऊसमध्ये पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथे त्यांचे स्वागत केले आहे.

25 Feb, 16:15 (IST)

दिल्लीमध्ये आज डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्र्म्प यांनी महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळावर भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं आहे. तर भारत- अमेरिका मैत्रीचं प्रतिक म्हणून एक झाड देखील लावण्यात येणार आहे.

25 Feb, 16:06 (IST)

भारत दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प व्यापार करारासह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात हैदराबाद हाऊस येथे पोहचणार आहेत.

25 Feb, 15:55 (IST)

भारताच्या राष्ट्रपती भवनामध्ये डोनाल्ड ट्र्म्प यांचे जंगी स्वागत झाले आहे. डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी 21 तोफांची सलामी देण्यासोबतच तिन्ही दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आहे.

25 Feb, 15:47 (IST)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान आज राष्ट्रपती भवनामध्ये त्यांची अमेरिकन शिष्टमंडळासोबत ओळख करून देण्यात आली. यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या समवेत तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत.

25 Feb, 15:37 (IST)

अमेरिकन  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि पत्नी मेलानिया यांचं दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन परिसरामध्ये आगमन झाले असून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्निक त्यांचे स्वागत केले असून तिन्ही दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले आहे. 

25 Feb, 15:23 (IST)

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या भारत दौर्‍याच्या आज दुसर्‍या दिवसाची सुरूवात राष्ट्रपती भवनापासून होणार आहे. ट्रम्प  यांची मुलगी आणि सिनियर अ‍ॅडव्हायझर इव्हांका ट्र्म्प राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाली असून थोड्याच वेळात डोनाल्ड ट्र्म्प देखील पोहचणार आहेत.

Read more


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प (US President Donald Trump)  यांच्या भारत दौर्‍याचा आज (25 फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. काल 11.40च्या आसपास भारतामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. त्यानंतर मोटेरा स्टेडियमवरून भारतीयांना संबोधित केल्यानंतर आग्रा येथे ताजमहालाला त्यांनी भेट दिली. आज दिल्लीमध्ये डोनाल्ड ट्र्म्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामध्ये बैठक होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये भारत-अमेरिका यांच्यामधील व्यापार संबंधी करारावर चर्चा होणार आहे. त्यासोबतच युएस एम्बेसी आणि तेथील कर्मचार्‍यांसोबत चर्चा, रात्री अमेरिकेला निघण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. काल मोटेरा स्टेडियमवर केलेल्या घोषणेप्रमाणे आज भारतासोबत अमेरिकेचा 3 बिलियन अमेरिकन डॉलर्सचं डिफेन्स डिल होण्याची शक्यता आहे.

भारत-अमेरिका व्यापार दौर्‍यासोबतच आज सकाळी डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांची पत्नी मेलानिया महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहे. यावेळेस ट्र्म्प कुटुंबियांसोबतच अमेरिकन राजदूतावासातील कर्मचारी त्यांच्यासोबत असतील. Namaste Trump कार्यक्रमामधून डोनाल्ड ट्र्म्प यांनी केलं नरेंद्र मोदी यांचे कौतुक; दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचा पुनरूच्चार.  

बौद्धिक संपदा हक्क, व्यापारसुलभता आणि देशाची अंतर्गत सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याविषयी पाच करारही मंग‌ळवारी होतील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी जाहीर केले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now