UPI Transactions: नऊ अब्ज व्यवहारांतून 14 लाख कोटींची उलाढाल; यूपीआयचा विक्रम

दरम्यान, UPI ने या वर्षी जानेवारीमध्ये 8 अब्ज व्यवहार नोंदवले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 7.5 अब्ज, मार्चमध्ये 8.7 अब्ज आणि एप्रिलमध्ये 8.89 अब्ज व्यवहार झाले होते. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, पेमेंट सिस्टमने एकूण 83 अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया केली, ज्याचे मूल्य 139 लाख कोटी रुपये होते.

(Photo Credits: AIR/ Twitter)

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) म्हणजेच यूपीआय (UPI) व्यवहारांचा विक्रम केला आहे. प्राप्त माहितीनुसार, यूपीआयने पाठिमागच्याच महिन्यात नऊ अब्जांहून अधिक व्यवहारांसह तब्बल 14 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेची उलाढाल केली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दिलेल्या माहितीनुसार, UPI ने मे 2023 मध्ये एकूण 9.41 अब्ज व्यवहार नोंदवले. दरम्यान, UPI ने या वर्षी जानेवारीमध्ये 8 अब्ज व्यवहार नोंदवले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 7.5 अब्ज, मार्चमध्ये 8.7 अब्ज आणि एप्रिलमध्ये 8.89 अब्ज व्यवहार झाले होते. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, पेमेंट सिस्टमने एकूण 83 अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया केली, ज्याचे मूल्य 139 लाख कोटी रुपये होते.

भारताची स्वदेशी पेमेंट प्रणाली युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस UPI ही जागतिक स्तरावर स्वीकृत पेमेंट प्रणालींपैकी एक आहे आणि 2016 मध्ये लॉन्च झाल्यापासून ती एक विश्वासार्ह पेमेंट मोड म्हणून उदयास आली आहे. (हेही वाचा, How To Use UPI Lite: यूपीआय लाईट कसे वापरावे? App, फिचर आणि व्यवहार याबाबत घ्या जाणून)

काय आहे UPI?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतातील एक रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. जी वापरकर्त्यांना एका मोबाइल ऍप्लिकेशनशी एकाधिक बँक खाती लिंक करण्यास सक्षम करते. मोबाईल प्लॅटफॉर्मवर बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरण सुलभ करण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ही प्रणाली लॉन्च करण्यात आली.

UPI वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून एक साधा आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस वापरून पैसे पाठवू आणि प्राप्त करुन देतो. सोप्या भाषेत सांगायचे तर पैशांचे व्यवहार अधिक सूलभ होण्यासाठी यूपीआय एक सक्षम प्रणाली उपलब्ध करुन देते. ही प्रणाली "व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस" (VPA) सिस्टीमवर चालते. हे VPA बँक खात्याच्या तपशिलांसाठी प्रॉक्सी म्हणून काम करते आणि बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड यासारखी संवेदनशील माहिती शेअर करण्याची गरज दूर करते.

UPI द्वारे व्यवहार सुरू करण्यासाठी, वापरकर्त्यांना प्राप्तकर्त्याचा VPA प्रविष्ट करणे किंवा QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. वापरकर्त्याच्या पसंती आणि त्यांच्या बँकिंग अॅपच्या क्षमतेनुसार, पिन, फिंगरप्रिंट किंवा पॅटर्न लॉकसह विविध पद्धती वापरून व्यवहार अधिकृत केले जाऊ शकतात.