UP Shocker: आपल्या मैत्रिणीसोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने कापला प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट; कानपूरमधील धक्कादायक घटना

त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला चौबेपूर सीएचसीमध्ये दाखल केले, तेथून त्याला कानपूरला हलवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून त्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर देहातमध्ये (Kanpur) एका प्रेयसीने आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट (Private Parts) कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आपला प्रियकर आपल्या मैत्रिणीशी शारीरिक संबंध ठेवत नसल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. हा तरुण रात्री उशिरा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असता तेथे हा प्रकार घडला.

आरोपी महिला आपल्या प्रियकराला तिच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. मात्र तरुणाने यासाठी नकार दिला. त्यानंतर महिलेने त्याचे गुप्तांग कापले. इन्स्पेक्टर संजय पांडे यांनी सांगितले की, जखमी व्यक्तीला उपचारासाठी कानपूरला पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चौबेपूर पोलीस सर्कलमधील एका गावात घडली. या ठिकाणी पिडीत व्यक्तीचे गावातील एका विवाहित महिलेशी संबंध होते.

माहितीनुसार, सोमवारी रात्री महिलेने तिच्या प्रियकराला भेटायला बोलावले होते. त्याचवेळी तिथे महिलेची एक मैत्रीणही उपस्थित होती. महिलेने आपल्या प्रियकरावर आपल्या मैत्रिणीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आणि जेव्हा त्याने यास नकार दिला तेव्हा तिने त्याचे प्रायव्हेट पार्ट कापला.

घडल्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला तरुण कसातरी घरी पोहोचला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला चौबेपूर सीएचसीमध्ये दाखल केले, तेथून त्याला कानपूरला हलवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून त्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा: माणुसकीला काळीमा! पटना येथे 1500 रुपयांच्या कर्जासाठी दलील महिलेला विवस्त्र करून मारहाण; चेहऱ्यावर केली लघवी)

घटनेनंतर गावातील एका महिलेसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे पीडित तरुणाने उघड केले. ही महिला लग्नानंतर काही काळापासून पतीपासून वेगळी राहत होती. जखमी अवस्थेत तरुण जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तरुणाला या घटनेबाबत तक्रार पत्र सादर करण्यास सांगितले आहे, जेणेकरून एफआयआर नोंदवता येईल. मात्र, लज्जापोटी तरुणाने सध्या तरी अशी कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे.