धक्कादायक! Covid-19 टेस्ट करताना सरपंचांच्या नाकातच मोडली Swab Stick; घशात जाऊन अडकली, जाणून घ्या काय घडले पुढे
कोरोनाची चाचणी करताना नमुने घेण्यासाठी तुमच्या नाकामध्ये स्वॅब स्टिक (Swab Stick) घातली जाते. अनेक लोक या प्रक्रियेला घाबरतात. मात्र जर का ही स्वॅब स्टिक तुमच्या नाकातच तुटली आणि आतच अडकली तर?
आजकाल कोरोना विषाणू चाचणी (Coronavirus Test) करून घेणे ही गोष्ट सामान्य झाली आहे. कोरोनाची चाचणी करताना नमुने घेण्यासाठी तुमच्या नाकामध्ये स्वॅब स्टिक (Swab Stick) घातली जाते. अनेक लोक या प्रक्रियेला घाबरतात. मात्र जर का ही स्वॅब स्टिक तुमच्या नाकातच तुटली आणि आतच अडकली तर? कल्पनाही करवत नाही ना? असेच एक प्रकरण तेलंगणाच्या (Telangana) करीमनगरमध्ये (Karimnagar) समोर आले आहे. येथे रामदुगु तालुक्यातील व्यंकटारोपल्ली गावचे सरपंच जुवाजी शेखर (Juvaji Shekar) यांची कोरोना चाचणी घेण्यात येत होती, परंतु त्यावेळी नाकातच स्वॅब स्टिक तुटली त्यानंतर त्यांना असह्य वेदनांचा सामना करावा लागला.
ही घटना शुक्रवारी घडल्याचे सांगितली जात आहे. सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेऊन गावात रॅपीड एंटीजन टेस्टचे आयोजन केले होते. गावकऱ्यांसाठी रोल मॉडेल म्हणून स्वत: सरपंचांनी सर्वप्रथम चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, परंतु ही गोष्ट त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. जुवाजी शेखर एंटीजन चाचणी घेण्यासाठी स्थानिक गोपाळरूपेट प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. पण नमुना घेण्यासाठी त्यांच्या नाकात स्वॅब स्टिक टाकताच ती तुटली. त्यानंतर असह्य वेदनेने जुवाजी शेखर तळमळू लागले. (हेही वाचा: Covid-19 लस घेतल्यावर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होते? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य)
सुरुवातीला डॉक्टर आणि परिचारिकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर जुवाजी शेखर करीमगर येथील खासगी रूग्णालयात गेले आणि शेवटी एंडोस्कोपीच्या माध्यमातून स्वॅब स्टिक काढून टाकली. डॉक्टरनी सांगितले की, स्वॅब स्टिक नाकातून घसरली आणि त्यांच्या घशात अडकली, अखेर ती एंडोस्कोपीने काढून टाकली आहे.
दरम्यान याआधी अफवा पसरली होती की, स्वॅब स्टिक नाकात घातल्याने मेंदूला इजा पोहोचते. बीबीसीच्या अहवालात लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनच्या टॉम विंगफिल्डचा हवाला देत असे म्हटले आहे की, ‘नाकात काही जाणे हे नक्कीच विचित्र आहे. स्वॅबचा नमुना घेत असताना किंचित खाज सुटणे किंवा गुदगुल्या होऊ शकतात परंतु वेदना होत नाही किंवा मेंदूला इजा होत नाही.