Shri Krishna Quotes: भगवतगीतेमध्ये श्रीकृष्णाने केलेले हे '5' उपदेश तुम्हांला आयुष्याकडे सकारात्मकतेने पहायला शिकवतील!
भगवान कृष्ण हे विष्णूचाच एक अवतार होते.
भगवतगीता हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र ग्रंथ आहे. कुरूक्षेत्रावर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशांचे यांमध्ये कथन आहे. 18 अध्याय आणि 700 श्लोकांची ही भगवतगीता (Bhagvatgeeta) केवळ युद्धभूमीवरील अर्जुनासाठी नव्हती तर ती आज 21व्या शतकामध्येही मनुष्यलोकांमध्ये जीवनाचा गाडा रेटताना समोर येणार्या लहान मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी मदत करत आहे. असं म्हणतात की भगवत गीतेमधील कोणतेही पान वाचलं तरी तुम्हांला तुमच्या आयुष्यातील एका समस्येवर उत्तर मिळू शकतं. मग अध्यात्माचा मार्ग धरून आपला जीवनप्रवास पुढे नेणार्यांना भगवतगीता दिशादर्शक आहे.
जीवनाच्या रहाटगाडग्यामध्ये अनेकदा आपण अगदी क्षुल्लक कारणावरून पराचा कावळा करून आपल्याच समस्या आणि दु:ख मोठी करून ती कुरवाळत बसतो. पण जीवनातला प्रत्येक क्षण खास आणि पूर्ण जगण्याचा संदेश देणारे भगवान श्रीकृष्ण यांचे हे कोट्स वाचलेत तर तुम्ही देखील आयुष्याकडे सकारात्मकतेने बघाल. नक्की वाचा: Prabodhini Ekadashi 2022 Wishes: कार्तिकी एकादशीनिमित्त खास Messages, Image, Greetings पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा .
भगवान श्रीकृष्ण यांचे कोट्स
5000 वर्षांपूर्वी 25 डिसेंबर दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. भगवान कृष्ण हे विष्णूचाच एक अवतार होते. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांच्याविषयी मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच हिंदू धर्मीय याला एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शनपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ मानतात.