Rakesh Jhunjhunwala Property: आलीशान घर, लग्जरी गाड्या-एअरलाईन्स; पाहा किती हजार कोटींची संपत्ती कुटुंबासाठी सोडून गेले झुनझुनवाला

ज्यामुळे त्यांच्या संपत्तीचा वारस आणि विभागणी याला एक दिशा मिळू शकणार आहे. झुनझुनवाला यांची यांची तब्बल 30,000 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.

Rakesh Jhunjhunwala | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचे काय? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. झुनझुनवाला हे भारतीय शेअर बाजारातील एक मोठे व्यक्तीमत्व होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी खरेदी केलेल्या समभागांचे, संपत्तीचे (Jhunjhunwala Property Distribution) पुढे काय होणार याबाबत अनेक चर्चा होत्या. दरम्यान, त्यांचे मृत्यूपत्र पुढे आले आहे. ज्यामुळे त्यांच्या संपत्तीचा वारस आणि विभागणी याला एक दिशा मिळू शकणार आहे. झुनझुनवाला यांची यांची तब्बल 30,000 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. या संपत्तीमध्ये बड्या कंपन्यांचे समभाग आणि इतर काही मालमत्तांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार ही संपत्ती त्यांची पत्नी आणि तीन मुलांना दिली जावी असे म्हटले आहे.

राकेश झुनझुनवाला हे अनेकदा आपल्याला चार अपत्ये आहेत. चौथे अपत्य म्हणजे दान असल्याचे ते अनेकदा सांगत. त्यामुळे सहाजिकच त्यांनी संपत्तीतील काही वाटा दान स्वरुपात देण्याबाबत योजना करुन ठेवल्याचे सांगितले जात आहे. झुनझुनवाला यांच्याशी संबंधीत कायदेशीर बाबी पाहणाऱ्या चमुतील एका व्यक्तीने नाव न झापण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांची संपत्ती सूचीबद्ध आणि गैरसूचीबद्ध कंपन्यांसोबतच अस्थायी संपत्तीमधील वाटणी ही त्यांची पत्नी आणि तीन मुलांना दिली जाईल. (हेही वाचा, Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटशिवाय राकेश झुनझुनवाला 'या' ठिकाणीही होते 'बिग बुल')

राकेश झुनझुनवाला हे आपल्या गुंतवणुकीच्या खास मॉडेलसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 35 कंपन्यांच्या होल्डिगच्या मालकी रुपातही पाहिले जायचे. त्यानी प्रामुख्याने बांधकाम आणि करार (11 टक्के), Miscellaneous (नऊ टक्के), बँका (खाजगी क्षेत्र) (6 टक्के), वित्त (सामान्य) (6 टक्के), बांधकाम आणि करार (नागरी) (6 टक्के), औषधनिर्माण (6 टक्के), आणि बँक (सार्वजनिक क्षेत्र) (3 टक्के) क्षेत्रात गुंतवणूक केली होती.

झुनझुनवाला यांना तीन मुले आहेत. मुलगी (18), जुळी मुले आर्यमान आणि आर्यवीर (13). त्यांनी एक चौथे अपत्यही समजले होते. ज्याला ते दान म्हणत. दानालाही त्यांनी अपत्यच मानले होते. झुनझुनवाला यांची सूचीबद्ध असलेली संपत्ती 30,000 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जाते. अस्थायी रुपातील संपत्ती ही मुंबईच्या मलबाह हिल परिसरातील समुद्राच्या समोरची एक मोठी इमारत असल्याचे सांगितले जाते. जी त्यांनी 2013 मद्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँकेतून 17 कोटी रुपयांना खरेदी केली होती. तसेच, लोनावळा येथील एका घराचाही त्यात समावेश आहे.