Rahul Gandhi Attacks On BJP and Media: अर्थव्यवस्थेवरील संकटाबाबत बोललो तेव्हा भाजप आणि प्रसारमाध्यमांनी माझी खिल्ली उडवली; राहुल गांधी यांचे ट्विट, केंद्र सरकारवर निशाणा

मोठ्या कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बँकाही संकटात आहेत. मी काही महिन्यांपूर्वीच म्हटले होते की, देशात आर्थिक त्सुनामी येत आहे. परंतू, माझ्या या इशाऱ्याबाबत भाजप आणि प्रसारमाध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती.'

Rahul Gandhi | (PTI)

वायनाड येथील खासदार आणि काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करुन भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, आपण या आधीही भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकटाबाबत बोललो होतो. तेव्हा, भाजप आणि प्रसारमाध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'लघु आणि मध्यम उद्योग नष्ट होऊ लागले आहेत. मोठ्या कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बँकाही संकटात आहेत. मी काही महिन्यांपूर्वीच म्हटले होते की, देशात आर्थिक त्सुनामी येत आहे. परंतू, माझ्या या इशाऱ्याबाबत भाजप आणि प्रसारमाध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती.'

राहुल गांधी यांनी विद्यमान अर्थिक वर्षात अर्थव्यवस्था मोठी संकटात सापडण्याची चिन्हे असल्याचे सांगत मंगळवारी (7 जुलै) दावा केला होता की, आर्थिक अव्यवस्थापनामुळे (Economic Mismanagement) देशभरातील लाखो कुटुंबांना फटका बसेल. त्यामुळे Economic Mismanagement स्वीकारले जाणार नाहीत. राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक विकास दरात मोठ्या प्रमाणावर घड होण्याचा पूर्वांदाज दाखवणारी प्रसारमाध्यमांतीलकाही वृत्तं शेअर करत हे ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, भारताचे Economic Mismanagement हे हानिकारक असून, देशातील लक्षवधी कुटुंबाना त्याचा फटका बसेल. (हेही वाचा, India-China Border Dispute: राहुल गांधी यांच्या तीन प्रश्नांचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार देणार का? )

दरम्यान, कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन यातून भारती अर्थव्यवस्था लवकरच सावरेल. देशातील विविध उद्योग, विविध क्षेत्रं पुन्हा नव्याने भरारी घेतील, असा अंदाज अभ्यासक वर्तवत आहेत. असे घडले तर देशातील लक्षवधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ज्या जूनच्या अहवालानुसार भारतातील विकास दर शून्याच्याही खाली 4.5 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. हा अंदाज एप्रिल 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आयएमएफ अहवालाच्या 6.4 टक्क्यांनी कमी आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif