Pt Shivkumar Sharma Passes Away: प्रसिद्ध संंतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे निधन

प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार यांची जोडी 'शिव-हरि' या नावाने प्रसिद्ध आहे.

Shivkumar Sharma | PC: Twitter @Samcool412

प्रख्यात संतूर वादक शिवकुमार शर्मा (Pt Shivkumar Sharma) यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. संतूर या वाद्याला लोकप्रियता मिळवून देणारे शिवकुमार शर्मा काळाच्या पडद्याआड गेल्याच्या वृत्ताची माहिती त्यांच्या आत्मचरित्रकार Ina Puri यांनी सांगितलं आहे. दरम्यान त्यांच्या शिष्यांकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. शिवकुमार यांना मागील 6 महिन्यांपासून किडनीचा विकार होता. ते डायलिसिस वर होते. आज त्यांची कार्डिएक अरेस्टने प्राणज्योत मालवली आहे. कश्मीरचे लोकवाद्य 'संतूर' याला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. हे वाद्य अभिजात संगीतामध्ये आणण्यामध्ये त्यांनी परिश्रम घेतले आहेत.

शिवकुमार यांचा जन्म 1938 साली जम्मू मध्ये झाला होता. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी 1980 साली 'सिलसिला' चित्रपटामधून पदार्पण केले. ‘फासले’, ‘चांदणी’, ‘लम्हे’ , ‘डर’या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. संतुरवादनासोबतच शिवकुमार उत्तम गायक देखील होते. ‘कॉल ऑफ द व्हॅली’हा शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांचा अल्बम फार गाजला होता. प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार यांची जोडी 'शिव-हरि' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक कामं एकत्र केली आहेत. RIP Pandit Shiv Kumar Sharma: पंडीत शिवकुमार शर्मा यांच्या निधनावर PM Narendra Modi, Nitin Gadkari ते Rahul Deshpande यांनी व्यक्त केला शोक; पहा प्रतिक्रिया.

शिवकुमार शर्मा यांच्या निधनाचं वृत्त

दरम्यान शिवकुमार यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 1986 साली संगीत नाटक अदाकमी, 1991 साली पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मविभूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. Lata Mangeshkar Passes Away: ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन, 'युग संपले' म्हणत संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली .

शिवकुमार यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत.