PM Modi Interacts With Shubhanshu Shukla: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभांशू शुक्ला यांच्याशी साधला संवाद; स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्याची व्यक्त केली इच्छा
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याला मिशन गगनयान पुढे नेले पाहिजे. आपल्याला आपले स्वतःचे अंतराळ स्थानक बांधायचे आहे, आपल्याला भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवायचे आहे. या सर्व मोहिमांमध्ये तुमचा अनुभव खूप उपयुक्त ठरणार आहे.
PM Modi Interacts With Shubhanshu Shukla: भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) हे अंतराळात जाणारे 634 वे अंतराळवीर बनले आहेत. याशिवाय, ते अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी शनिवारी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पीएमओने केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उपस्थित असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला.'
शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुमच्या नावात शुभ आहे आणि तुमचा प्रवास एका नवीन युगाची शुभ सुरुवात आहे. अंतराळात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. तथापी, शुभांशू शुक्ला यांनी म्हटलं आहे की, 'मी येथे पूर्णपणे ठीक आहे, मला पूर्णपणे नवीन वाटत आहे. हा फक्त माझा प्रवास नाही तर देशाचा प्रवास आहे. आम्ही दिवसातून 16 वेळा सूर्यास्त आणि 16 वेळा सूर्योदय पाहतो. अंतराळातून पृथ्वी पूर्णपणे एक दिसते. येथून कोणतीही सीमारेषा दिसत नाही. परंतु, येथून पहिल्यांदा भारत पाहिला तेव्हा येथून भारत खरोखरच भव्य दिसतो. (हेही वाचा - Axiom 4 Mission: इस्रोचे शुभांशु शुक्ला आणि आंतरराष्ट्रीय अंतराळवीर SpaceX Dragon द्वारे ISS वर पोहोचण्यात यशस्वी)
दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय आहात, तिथली परिस्थिती कशी आहे? यावर शुभांशू शुक्ला म्हणाले, 'येथे सर्व काही वेगळे आहे. मी माझे पाय बांधले आहेत, नाहीतर मी वर गेलो असतो. येथे तुम्ही कुठेही झोपू शकता. भारत धावत आहे आणि हे अभियान त्या शर्यतीतील पहिले पाऊल आहे. आपले अंतराळात एक स्थानक देखील असेल.' भारताच्या तरुण पिढीला संदेश देताना शुभांशू शुक्ला म्हणाले, भारत कोणत्या दिशेने जात आहे याबद्दल आपण खूप उंच स्वप्ने पाहिली आहेत. यशाचा कोणताही एक मार्ग नाही, परंतु प्रत्येक मार्गावर एक गोष्ट समान आहे की तुम्ही कधीही प्रयत्न करणे सोडू नका. (हेही वाचा, Axiom-4 Mission Delayed: शुभांशू शुक्ला यांना घेऊन जाणारे अॅक्सिओम-4 मिशन पुन्हा लांबणीवर; नासा लवकरच निश्चित करणार नवीन प्रक्षेपणाची तारीख)
पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशु शुक्लाशी संवाद -
PM @narendramodi interacted with Group Captain Shubhanshu Shukla, who is aboard the International Space Station. pic.twitter.com/Q37HqvUwCd
— PMO India (@PMOIndia) June 28, 2025
पंतप्रधान मोदींनी शुभांशू शुक्लाला दिला गृहपाठ -
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याला मिशन गगनयान पुढे नेले पाहिजे. आपल्याला आपले स्वतःचे अंतराळ स्थानक बांधायचे आहे, आपल्याला भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवायचे आहे. या सर्व मोहिमांमध्ये तुमचा अनुभव खूप उपयुक्त ठरणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही तिथे तुमचे अनुभव नोंदवत असाल. यावर शुभांशू शुक्ल म्हणाले, येथे मिळालेला प्रत्येक अनुभव मी आत्मसात करत आहे. हे अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचे असतील. आम्ही या अनुभवांचा वापर आमच्या मोहिमेत करू शकू आणि शक्य तितक्या लवकर आमचे ध्येय पूर्ण करू शकू.
तथापी, पंतप्रधान मोदी यांनी शुंभाशूशी बोलताना म्हटलं की, आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही. विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला ते जलद गती आणि नवीन शक्ती देईल. भारत जगासाठी नवीन अंतराळ शक्यतांचे दरवाजे उघडणार आहे. आता भारत केवळ उड्डाण करणार नाही तर भविष्यात नवीन उड्डाणांसाठी व्यासपीठ देखील तयार करेल.
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2025 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

