Axiom-4 Mission Delayed: शुभांशू शुक्ला यांना घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-4 मिशन पुन्हा लांबणीवर; नासा लवकरच निश्चित करणार नवीन प्रक्षेपणाची तारीख

यापूर्वी 'Axiom-4' मोहीम 4 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोहीम प्रथम 29 मे रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 8 जून, 10 जून आणि 11 जून रोजी देखील हे मोहीम प्रक्षेपित होऊ शकली नाही.

Axiom-4 Mission Delayed: शुभांशू शुक्ला यांना घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-4 मिशन पुन्हा लांबणीवर; नासा लवकरच निश्चित करणार नवीन प्रक्षेपणाची तारीख
Axiom-4 Mission | Twitter

Axiom-4 Mission Delayed: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) प्रक्षेपित होणारी 'Axiom-4' मोहीम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) या मोहिमेवर जाणार होते, परंतु अमेरिकन अंतराळ संस्था NASA ने ही मोहीम देखील प्रक्षेपित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ISS ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की NASA, Axiom Space आणि SpaceX या मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी नवीन तारखेचा विचार करतील. ही मोहीम 22 जून रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु सेवा मॉड्यूलच्या मागील भागाच्या दुरुस्तीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे.

सलग 5 व्यांदा मिशन प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले -

यापूर्वी 'Axiom-4' मोहीम 4 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोहीम प्रथम 29 मे रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 8 जून, 10 जून आणि 11 जून रोजी देखील हे मोहीम प्रक्षेपित होऊ शकली नाही. खराब हवामानामुळे आणि नंतर रॉकेटमध्ये द्रव गळतीमुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. तिसऱ्यांदा अंतराळ स्थानकात गळती दुरुस्तीमुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली. तथापी, चौथ्यांदा रॉकेटमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे मोहीम पुढे ढकलावी लागली. (हेही वाचा -Axiom 4 Mission Delay: भारताचा पहिला गगनयात्री ISS कडे जाण्याची मोहीम लांबणीवर; नेमके कारण काय?)

दरम्यान, आता तांत्रिक समस्येमुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा), इंडियन स्पेस सायन्स ऑर्गनायझेशन (इस्रो) आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) संयुक्तपणे 'अ‍ॅक्सिओम-4' मोहिमेचे प्रक्षेपण करतील. ही मोहीम अ‍ॅक्सिओम कंपनीची चौथी मोहीम आहे, जी नासाच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. ही मोहीम स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटने प्रक्षेपित केली जाणार आहे. परंतु रॉकेटमध्ये वारंवार बिघाड होत आहेत. (हेही वाचा, ISRO आणि ESA ची आगामी AXIOM-4 मिशनसाठी जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी)

14 दिवसांच्या या मोहिमेसाठी 5140 कोटी रुपये (60 दशलक्ष डॉलर्स) खर्च येईल. मोहिमेच्या 14 दिवसांत, जमिनीवरील 60 शास्त्रज्ञ चार अंतराळवीरांसह संशोधन करतील. हे सर्व 60 शास्त्रज्ञ जगभरातील 31 देशांचे प्रतिनिधित्व करतील. भारतीय अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांची या मोहिमेत विशेष भूमिका असणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 01:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).