
स्पेसएक्सने (SpaceX) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) जाणाऱ्या अॅक्सिऑम 4 (Ax-4) मोहिमेचा प्रक्षेपण पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. 11 जून 2025 रोजी नियोजित असलेली ही गगनयात्री (Gaganyatri) मोहीम Falcon 9 Rocket च्या द्रव ऑक्सिजन (LOx) गळतीमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. पोस्ट-स्टॅटिक फायर तपासणीदरम्यान फाल्कन 9 रॉकेटमध्ये द्रव ऑक्सिजन गळती (LOx Leak) आढळली त्यानंततर ही मोहिम पुढे ढकलल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
इस्त्रोद्वारे अधिकृत पुष्टी
स्पेसएक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून म्हटले, “Falcon 9 च्या Ax-4 प्रक्षेपणाच्या तयारीनंतर झालेल्या तपासणीत LOx गळती आढळली. त्यामुळे प्रक्षेपण थांबवले असून, गळती दुरुस्त करून चाचणी पूर्ण झाल्यावर आणि रेंज (Range) उपलब्धतेनुसार नव्या तारखेची घोषणा केली जाईल.” या घोषणेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नेही अधिकृतपणे याची पुष्टी केली. ही मोहीम भारताचा पहिला गगनयात्री, गट कॅप्टन शुभांशू शुक्ला, यांना ISS कडे नेण्यासाठी नियोजित होती. (हेही वाचा, ISRO आणि ESA ची आगामी AXIOM-4 मिशनसाठी जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी)
एक गळती आणि मोहीम लांबणीवर
ISRO ने स्पष्ट केले की, प्रक्षेपण वाहनाच्या तयारी दरम्यान Falcon 9 वर 7 सेकंदांची हॉट टेस्ट करण्यात आली. यावेळी प्रपल्शन बे मध्ये LOx गळती आढळली. ISRO, SpaceX आणि Axiom Space यांच्यातील चर्चा झाल्यानंतर, गळती दुरुस्त करून संबंधित चाचण्या पूर्ण झाल्यावरच पुढील टप्प्याला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “11 जून 2025 रोजी नियोजित अॅक्सिऑम 4 मिशन लांबणीवर टाकण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पावले आवश्यक आहेत,” अशी माहिती ISRO चे अध्यक्ष व अवकाश आयोगाचे अध्यक्ष डॉ. वी. नारायणन यांनी दिली.
भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी ऐतिहासिक मोहीम
Ax-4 मोहीम ही जागतिक मानव अंतराळ मोहीमेमध्ये एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. या मोहिमेत भारत, पोलंड आणि हंगेरी या तीन देशांचे अंतराळवीर ISS वर जाणार असून, या देशांची ही दुसरी सरकारी मान्यताप्राप्त मानव अंतराळ मोहीम आहे. यापूर्वी या देशांनी 40 वर्षांपूर्वी अंतराळात मानवी उपस्थिती नोंदवली होती. (हेही वाचा, Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports)
- गट कॅप्टन शुभांशू शुक्ला हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर असतील.
- स्लावोझ उझनान्स्की हे 1978 नंतरचे पोलंडचे दुसरे ESA (युरोपियन स्पेस एजन्सी) अंतराळवीर असतील.
- तिबोर कापू हे 1980 नंतरचे हंगेरीचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर असतील.
- पेगी व्हिटसन, अनुभवी NASA अंतराळवीर, ही मोहीम कमांड करणार असून, त्यांचा हा दुसरा व्यावसायिक मानव अंतराळ मोहीम प्रकल्प आहे.
शुक्ला यांनी मोहिमेतील सहकारी आणि भारतासाठी या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “ही एक विलक्षण यात्रा आहे. माझ्या सहकाऱ्यांसोबत हे क्षण माझ्या आयुष्यातील कायमचे आठवणीत राहतील. माझी ही कहाणी भारतातल्या एका तरी मुलाचे आयुष्य बदलू शकते, अशी आशा आहे. तरच ही मोहीम माझ्यासाठी यशस्वी ठरेल.”
मोहीम लांबणीवर पडल्याची स्पेसेक्सकडून माहिती
Standing down from tomorrow’s Falcon 9 launch of Ax-4 to the @Space_Station to allow additional time for SpaceX teams to repair the LOx leak identified during post static fire booster inspections. Once complete – and pending Range availability – we will share a new launch date pic.twitter.com/FwRc8k2Bc0
— SpaceX (@SpaceX) June 11, 2025
Ax-4 मध्ये सर्वाधिक वैज्ञानिक प्रयोग
Axiom Space नुसार, Ax-4 मोहिमेत 60 हून अधिक वैज्ञानिक प्रकल्प आणि अभ्यास करण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 31 देशांमधील शास्त्रज्ञ व संस्थांद्वारे मांडले जातील, ज्यामध्ये भारत, अमेरिका, पोलंड, हंगेरी, सौदी अरेबिया, ब्राझील, नायजेरिया, UAE आणि युरोपमधील विविध देशांचा समावेश आहे.
मोहीम पुढे ढकलल्याची इस्त्रोद्वारेही पुष्टी
Postponement of Axiom 04 mission slated for launch on 11th June 2025 for sending first Indian Gaganyatri to ISS.
As part of launch vehicle preparation to validate the performance of booster stage of Falcon 9 launch vehicle, seven second of hot test was carried out on the launch…
— ISRO (@isro) June 11, 2025
हे Axiom Space च्या आतापर्यंतच्या सर्व मोहिमांमधील सर्वाधिक संशोधन आणि विज्ञानाधारित कार्य असणार आहे. संशोधन क्षेत्रांमध्ये मानवशास्त्र, पृथ्वी निरीक्षण, जीवनशास्त्र, जैविक आणि भौतिक शास्त्र यांचा समावेश आहे.
ही मोहीम NASA, ESA आणि संबंधित देशांच्या अंतराळ संस्थांच्या सहभागातून लो-अर्थ ऑर्बिटमधील जागतिक सहकार्य बळकट करते.
नवीन प्रक्षेपण तारीख लवकरच होणार जाहीर
या विलंबामुळे थोडी निराशा झाली असली, तरीही सुरक्षा आणि यशस्वी मोहिमेसाठी ही एक गरजेची प्रक्रिया आहे. SpaceX आणि Axiom Space लवकरच नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर करतील. Ax-4 मोहीम ही भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी केवळ एक वैज्ञानिक वाटचाल नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानव अंतराळ मोहीमेतील ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.