Positive News: इयत्ता 10वी परीक्षेत गणीतात 36 आणि इंग्रजीत 35 मार्क्स, आज आहे IAS अधिकारी; लोक म्हणायचे 'हा कामातून गेला'; जाणून घ्या 'सक्सेस स्टोरी
यात अनेक विद्यार्थीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. अनेकांना काहीसे अपयश आले.उत्तीर्ण झालेल्यांचे कौतुक झाले. हे कौतुक अयशस्वी झालेल्यांच्या वाट्याला येत नाही. त्यांच्यावर हेटाळणी, राग आणि हा कामातून गेला असे अनेक शिक्के मारले जातात.
Success Story: इयत्ता10वी, 12 परीक्षांचे निकाल नुकतेच लागले. यात अनेक विद्यार्थीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. अनेकांना काहीसे अपयश आले.उत्तीर्ण झालेल्यांचे कौतुक झाले. हे कौतुक अयशस्वी झालेल्यांच्या वाट्याला येत नाही. त्यांच्यावर हेटाळणी, राग आणि हा कामातून गेला असे अनेक शिक्के मारले जातात. पण आयुष्यात न करता येण्यासारखे काहीच नसते. आज आम्ही आपल्याला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. ज्या व्यक्तीला इयत्ता 10वीच्या परीक्षेत 100 पैकी गणितात केवळ 36 आणि विज्ञानात 38 गुण मिळाले होते. याही विद्यार्थ्याला त्या वेळी असेच टोमणे आणि 'हा वाया गेला' असे शिक्के मारले गेले. पण हा विद्यार्थी पुढे भारत सरकारच्या सेवेत मोठ्या पदावर पोहोचला.
ही कहाणी आहे गुजरात राज्यातील भरुच जिल्ह्यातील कलेक्टर तुषार सुमेरा (Tushar Sumera) यांची. ज्या कहाणीने अनेकांना प्रेरणा दिली आहे. होय, आयएएस IAS अधिकारी अवनीश शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी केलेले ट्विट इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. (हेही वाचा, Janardhan Bhoir: हा पठ्ठ्या आता हेलिकॉप्टरने दूध विकणार! भिवंडी येथील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांची Success Story)
ट्विट
शरण यांनी आपल्या ट्विटमध्य म्हटले आहे की, भरुच येथील कलेक्टर तुषार सुमेरा यांनी आपले इयत्ता 10वीचे मार्कशिट शेअर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, इयत्ता 10वी मध्ये त्यांना केवळ काठावर पास इतकेच गुण मिळाले आहेत. त्यांना इंग्रजीत 100 पैकी केवळ 35, गणितात 36 आणि विज्ञानामध्ये 38 मार्क्स मिळाले आहेत. पण त्यांनी स्वत:मध्ये इतके बदल केले की, कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या गावाचेही नाव उज्ज्वल केले.
ट्विट
इयत्ता 10वी मध्ये मिळालेले गुण हे आपले भविष्य ठरवू शकत नाहीत. IAS अधिकारी अवनीश शरण यांच्या ट्विटला भरुच येथील कलेक्टर तुषार सुमेरा यांनी रिट्विट करत उत्तर दिले आहे. 'धन्यवाद सर'. वाचकांच्या माहितीसाठी असे की, भरुचमध्ये उत्कर्ष पहल अभियानांतर्गत केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.