Spyware Pegasus च्या मदतीने भारतात 300 फोन हॅक; मंत्री, नेते मंडळींसह न्यायाधीश आणि पत्रकारांच्या नावाचा समावेश- रिपोर्ट
तत्पूर्वी आता पेगाससचा जो कथित रिपोर्ट समोर आला आहे तो काही समस्या निर्माण करु शकतो. जगातील 17 मीडिया संस्थांच्या कंसोर्टियमकडून दावा करण्यात आला आहे की, जगभरातील सरकार आपल्या देशातील पत्रकार, कार्यकर्ते आणि नेत्यांचे फोन टॅप करत आहेत.
आजपासून संसंदेचे पावसाळी सत्र सुरु होणार आहे. तत्पूर्वी आता पेगाससचा जो कथित रिपोर्ट समोर आला आहे तो काही समस्या निर्माण करु शकतो. जगातील 17 मीडिया संस्थांच्या कंसोर्टियमकडून दावा करण्यात आला आहे की, जगभरातील सरकार आपल्या देशातील पत्रकार, कार्यकर्ते आणि नेत्यांचे फोन टॅप करत आहेत. यामध्ये भारताचे नाव सुद्धा आहे. ग्लोबल कोलॅब्रेटिव्ह इन्वेस्टिगेशनच्या रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, पेगासस स्पायवेयरने जवळजवळ भारतातील 300 मोबाइल नंबर निशाण्यावर ठेवले आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांचा समावेश आहे. या यादीत तीन विरोधी पक्षनेते आणि संविधानाच्या पदावर असलेल्या महत्वाच्या व्यक्तींसह काही पत्रकार आणि व्यापाऱ्यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे.
ग्लोबल खोजी पत्रकारांच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, जगभरातील 50 हजार लोकांचे फोन टॅप करण्यात आले आहेत. ही लिस्ट 16 मीडिया हाउससोबत शेअर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्म द वायर यांचा सुद्धा समावेश आहे. भारतामधील या लिस्ट मध्ये पत्रकार, मंत्री, विरोधी पक्षनेते, वैज्ञानिक, मानवाधिकार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पुढे असे सांगण्यात आले आहे की, भारतातील 300 लोकांचे क्रमांक भारताने ओळखले होते आणि अशी अपेक्षा व्यक्त केली होती की, त्यांचे फोन पॅगाससच्या माध्यमातून हॅक केले असावेत.(Pegasus Software द्वारे मोदींचे कॅबिनेट मंत्री, आरएसएस नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन होत आहेत टॅप? Subramanian Swamy शेअर करणार डिटेल्स)
ग्लोबल मीडियाच्या या दाव्यानंतर भारतात या संदर्भात राजकीय वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी याच्या खुलासाबद्दल मोदी सरकारला घेरले आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, जर ते बरोबर होते तर आता कृपया हे सुद्धा सांगा हे कोण करत आहे. गृह मंत्रालयाकडून परवानगी घेण्यात आली होती का? असे विविध प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थितीत केले आहेत.
या रिपोर्टवर भारत सरकारने सुद्धा अधिकृत विधान जाहीर केले आहे. सरकारने असे म्हटले आहे की, ज्या लोकांच्या फोन टॅपिंगचा दावा केला जात आहे त्याला कोणाताही आधार नाही आहे. याचा वास्तवासोबत कोणाताही संबंध नाही. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे दावे करण्यात आले होते.