नीरव मोदीच्या अलिबागमधील अनधिकृत बंगल्यावर कारवाई
पंजाब बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार असलेला हिरेव्यापारी निरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.
पंजाब नॅशनल बँकेला (Punjab National Bank) हजारो कोटींचा चुना लावून फरार असलेला हिरेव्यापारी नीरव मोदीचा (Nirav Modi) अलिबाग येथील अनधिकृत बंगला अखेर पाडणार असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. नीरव मोदी, पीएनबी घोटाळा: आयकर विभागाला ८ महिन्यांपूर्वीच होती कल्पना तरीही बाळगले मौन
राज्य सरकारच्या नियमांचे व तटीय क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या अन्य 58 खाजगी मालमत्ता पाडण्याची नोटीस खंडपीठाने बजावली होती. त्यामुळे बेकायदेशीर कामांवर लवकरच कारवाई करण्याची हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. 4 डिसेंबरला अलिबाग येथील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर इतर अनधिकृत बंगल्याच्या मालकांना आठवडाभराच्या आत बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नीरव मोदीला धक्का; ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती जप्त
अलिबागमधील किहीम गावात नीरव मोदी यांचा अनधिकृत बंगला आहे. तर आवास गावात मेहुल चोक्सीचा बंगला आहे. बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केला होता. त्यानंतर राज्य सरकारने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आला.