BSNL, MTNL कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

(Mahanagar Telephone Nigam Ltd) ही कंपनी केवळ दिल्ली आणि मुंबई शहरांमध्ये सेवा देते. तर, देशातील इतर सर्व भागांमध्ये भारत संचार निगम लि. (Bharat Sanchar Nigam Ltd) कंपनी सेवा देते. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कंपन्या तोट्यात सुरु आहेत.

BSNL, MTNL | (Photo Credit: Archived, edited, representative images)

MTNL to merge with BSNL?:  बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांचे लवकरच विलीनीकरण झाले तर आश्चर्य वाटून घेऊन नका. दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्या केंद्र सरकारच्या अधिकपत्याखाली येतात. तसेच, या कंपन्या गेले बराच काळ आर्थिक तोट्यात आहेत. त्यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या या कंपन्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशिल आहे.

बीएसएनएल, एमटीएनएल विलीनीकरण की पुनरुज्जीवन?

दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची जोरदार चर्चा असली तरी, दोन्ही कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा पर्यायही केंद्र सरकार वापरु शकते. अर्थात दोन्ही कंपन्यांचे (बीएसएनएल आणि एमटीएनएल) विलीनीकरण करायचे की पुनरुज्जीवन, याबाबत केंद्र सरकारने अद्याप काहीच स्पष्ट केले नाही. मात्र, दोन्ही कंपन्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.

दोन्ही कंपन्यांपैकी महानगर टेलिफोन निगम लि. (Mahanagar Telephone Nigam Ltd) ही कंपनी केवळ दिल्ली आणि मुंबई शहरांमध्ये सेवा देते. तर, देशातील इतर सर्व भागांमध्ये भारत संचार निगम लि. (Bharat Sanchar Nigam Ltd) कंपनी सेवा देते. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कंपन्या तोट्यात सुरु आहेत. (हेही वाचा, सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन)

सरकारकडे आराखडा तयार

दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांबाबत केंद्र सरकारकडे योग्य तो आराखडा तयार आहे. या आराखड्याबद्दलचा अहवाल मिळताच केंद्र सरकार कारवई करेन. प्रसाद यांनी पुढे बोलताना सांगितले की, मोबाईल कंपन्यांमध्ये असलेली प्रचंड स्पर्धा तसेच, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारी प्रचंड गुंतवणूक तसेच 4 जी सेवेचा अभाव यांमुळे बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या आर्थिक गर्तेत सापडल्या. (हेही वाचा, सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन)

बीएसएनएल कंपनीवर 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज

दरम्यान, केंद्र सरकार बीएसएनएल कंपनीस 6365 कोटी रुपये तर, एमटीएनएल कंपनीसाठी 2120 कोटी रुपयांची मदत करणार आहे. या मदतीसाठी सरकार दहावर्षांच्या कालावधीसाठी सरकारी बॉन्ड तारण ठेवणार आहे. प्राप्त माहितीनुसार बीएसएनएल कंपनीवर 14 हजार कोटी रुपयांचे देणेरुपातील कर्ज आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये कंपनीला तब्बल 31287 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आज घडीला कंपनीत 1.76 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना जर सेवानिवृत्ती दिली तर, उर्वरतीत कर्मचाऱ्यांची संख्या ही 5 वर्षात 75 हजार इतकी राहू शकते.

एमटीएनएल उत्पन्नातील 90 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च

एमटीएनएल मध्ये आग घडीला 22 हजार कर्मचारी काम करतात. तर, कंपनीवर 19 हजार कोटी रुपयांची उधारी आहे. कंपनी आपल्या एकूण उत्पन्नातील 90 टक्के रक्कम ही कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यावर खर्च करते. पुढील 6 वर्षांमध्ये कंपनीचे सुमारे 16 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.