IPL Auction 2025 Live

सर्वसामान्यांना मोदी सरकार लवकरच देणार गूड न्युज! करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख होणार?

नव्या मर्यादेनुसार 5 लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Income Tax Exemption Limit | Representational Image | (Photo Credits: PTI)

मागास सवर्णांना 10% आरक्षणानंतर आता मोदी सरकार अजून एक गूडन्यूज देण्याच्या तयारीमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी अर्थसंकल्पामध्ये (Budget 2019) करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. नव्या मर्यादेनुसार 5 लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घोषणा ठरू शकते.

केंद्रीय अर्थमंत्री 2019 सालचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2019 या दिवशी मांडणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या 2.5 लाख रूपये इतके उत्पन्न करमुक्त केले जाते. मात्र लवकरच दुप्पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. Budget 2019 : मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट; जाणून घ्या काय असेल अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य 

सध्या करप्रणालीचं स्वरूप काय?

आयकर विभाग सध्या 2.5 लाख ते 5 लाख रूपयांच्या उत्पन्नावर 5% कर, 5-10 लाख रूपयांवर 20% कर तर 10 लाखाहून अधिक उत्पन्न असणार्‍यांमध्ये 30% कर आकारला जातो. मात्र भविष्यामध्ये यामध्ये बदल होण्याची शक्यताआहे.

सीआईआई (CII)ने केलेल्या शिफारसीनुसार, 5 लाख रूपयांपर्यतचे उत्पन्न करमुक्त असेल. 5-10 लाख रूपयाच्या उत्पन्नावर 10%, 10-20 लाख रूपयांच्या उत्पन्नावर 20% तर 20 लाखाहून अधिक उत्पन्नावर 25% कर आकारला जावा असे सांगण्यात आलं आहे.