Misleading Advertisements: दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी सरकारने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे; Surrogate Ads वर बंदी

उत्पादन किंवा सेवेबद्दल चुकीची माहिती देणारी किंवा उत्पादनाच्या माहितीशी मेळ खात नसणारी कोणतीही जाहिरात ही फसवी जाहिरात आहे

Ministry of Consumer Affairs (File Image)

सरकारने शुक्रवारी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना (Misleading Advertisements) आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिराती आणि ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी मोफत दावे करणाऱ्या जाहिरातींचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये 'सरोगेट' जाहिरातींवरही बंदी घातली आहे.

सरोगेट जाहिरात हा जाहिरातीचा अशा एक प्रकार आहे ज्यामध्ये, एखाद्या र दुसर्‍या उत्पादनासोबत सिगारेट आणि अल्कोहोल सारख्या नियमन केलेल्या उत्पादनांचा प्रचार केला जातो. जसे सोडा वॉटरच्या बहाण्याने दारूचा प्रचार करणे किंवा वेलचीच्या बहाण्याने गुटख्याची जाहिरात करणे.

यासोबतच जाहिरातींसोबत ‘लवकर खरेदी करण्यास’ सांगता येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. जर कंपनी स्पेशल ऑफर, अर्धी किंमत किंवा फ्रीबीज सारखे दावे करत असेल, तर त्यांच्याकडे पुरेसा स्टॉक आहे याची खात्री करावी लागेल. टूथपेस्ट आणि चवनप्राश सारख्या उत्पादनांसाठी कोणताही व्यावसायिक वापरला जाऊ शकत नाही. जर कंपनीचा कोणता सदस्य जाहिरात करत असेल, तर त्याला/तिला कंपनीतील त्याचे स्थान देखील नमूद करावे लागेल.

या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा करताना, ग्राहक व्यवहार सचिव, रोहित कुमार सिंग म्हणाले, ‘ग्राहक जाहिरातींमध्ये खूप रस घेतात. सीसीपीए (CCPA) कायद्यांतर्गत, ग्राहकांच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची तरतूद आहे.’ (हेही वाचा: महागाईचा परिणाम! आता दुधासह सर्व दुग्धजन्य पदार्थ महाग होण्याची शक्यता)

ते पुढे म्हणाले, ‘एखादे उत्पादन आणि उद्योग अधिक स्पष्ट आणि लोकांना जागरूक करण्यासाठी, सरकारने आजपासून निष्पक्ष जाहिरातींसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत.’ प्रिंट, टेलिव्हिजन आणि ऑनलाइन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींना ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास केंद्रीय ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल.

सरकारने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या काळात अनेक दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही कारवाई करण्यात आली आहे. उत्पादन किंवा सेवेबद्दल चुकीची माहिती देणारी किंवा उत्पादनाच्या माहितीशी मेळ खात नसणारी कोणतीही जाहिरात ही फसवी जाहिरात आहे. यासोबतच उत्पादनाबाबत कोणतीही महत्त्वाची गोष्ट लपवली जात असेल, तर त्यालाही दिशाभूल करणारी जाहिरातही म्हटले जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif