मंगळुरु मधील दांपत्याची COVID19 च्या भीतीमुळे आत्महत्या, शवविच्छेदन दरम्यान चाचणी आली निगेटिव्ह

त्यानुसार एका दांपत्याने कोरोनाच्या (COVID19) भीतीमुळे आत्महत्या केली आहे. या दांपत्यांना मुलं-बाळ नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Death (Photo Credits-Facebook)

Mangaluru: मंगळुरु येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार एका दांपत्याने कोरोनाच्या (COVID19) भीतीमुळे आत्महत्या केली आहे. या दांपत्यांना मुलं-बाळ नसल्याचे सांगण्यात आले आहे. दोघांचा मृतदेह चित्रपुर येथील राहत्या घरी मिळाला आहे. पण ज्या भीतीमुळे दांपत्याने आत्महत्या केली होती त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर असे कळले की, त्यांचे कोविड19 चे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. रमेश सुवर्ण (45 वय) आणि पत्नी गुना (35 वय) अशी मृतांची ओखळ पटली आहे.

ऐवढे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी रिपोर्ट्सनुसार, रमेश याने एका मित्रासह पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांना एक ऑडिओ मेसेज पाठवला. त्याने असे म्हटले की, त्याला आणि त्याच्या बायकोला गेल्या सात दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. पुढे त्याने असे म्हटले की, माझ्या बायकोने रात्रीच गोळी घेऊन संपवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे तिने सकाळी गळफास लावून घेतला आहे. आता मी सुद्धा गळफास लावणार आहे असे शशी कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले आहे.(Woman Set on Fire in Mahoba: विनयभंगाच्या तक्रार केली म्हणून महिलेला जिवंत पेटवून दिले, उपचारादरम्यान पीडिताचा मृत्यू)

आयुक्तांना रमेश याचा मेसेज हा सकाळी 6.45 वाजता आला. अवघ्या 25 मिनिटांमध्ये पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली. मात्र तो पर्यंत उशिर झाला होता. या दांपत्याला वाटत होते की, त्यांना कोरोना झाला आहे. त्याचसोबत एकही मुल नसल्याचे आधीच ते तणावात होते आणि अन्य आरोग्याच्या समस्या सुद्धा त्यांना होत्या. मी त्यांना खुप समजवण्याचा प्रयत्न केला आणि फोन ठेवला असे त्यांनी म्हटले.(UP: माजी सैनिकाने 14 दिवस मुलाचा मृतदेह ठेवला डीप फ्रिजरमध्ये, समोर आले 'हे' कारण)

पोलिसांना एक सुसाइड नोट सुद्धा सापडली आहे. ती नोट गुना हिने लिहिली होती. त्यामध्ये तिने असे म्हटले होते की, आम्हाला ब्लॅकफंगस आणि कोविड19 होईल याची भीती वाटत होती. तिच्या आई-वडिलांना सुद्धा कोरोना झाला होता. रमेश हा मुळचा पदुबिद्री येथील असून त्याचे गुना हिच्यासोबत 2000 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर तिने एका बाळाला जन्म सुद्धा दिला होता. मात्र काही दिवसांनी त्या बाळाचा मृ्त्यू झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif