Madhya Pradesh: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, पीडितेवर आरोपीकडून दोन वर्ष बलात्कार
असे सांगितले जात आहे की, एक अल्पवयीन मुलगा गेल्या दोन वर्षांपासून तिची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार करत होता.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, एक अल्पवयीन मुलगा गेल्या दोन वर्षांपासून तिची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार करत होता. यामुळेच पीडिता गर्भवती राहिली. ओबेदुल्लागंज आरोग्य केंद्रात पीडितेने बाळाला जन्म दिला. पण बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला हमीदिया रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. परंतु तेथे उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला.(Rape Case: 'शारीरिक संबंधांसाठी पूर्वी घेतलेली संमती भविष्यातील लैंगिक संबंधासाठी लागू होत नाही'; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
या प्रकरणी ओबेदुल्लागंज आरोग्य केंद्राचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. अल्पवयीन मुलीची डिलिव्हरी केल्यानंतर सुद्धा रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली नाही.मुलावर तेथे कोणतेही उपचार न करता कारण देत भोपाल मधील हमीदिया रुग्णालयात पाठवण्यात आले. यामुळे आता संताप व्यक्त केला जात आहे.(Karnataka Crime: 'या' अभिनेत्रीची पतीविरोधात बलात्कार आणि हुंड्यांविरोधात तक्रार दाखल)
अल्पवयीन मुलीने जेव्हा मृत मुलाला जन्म दिल्याची माहिती पोलिसांना सांगितली गेली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. याबद्दल एसडीओपी ओबेदुल्लागंज मलकीत सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली आहे. तसेच पुढील कारवाई सुद्धा लवकरच केली जाईल.