Karnataka Crime: 'या' अभिनेत्रीची पतीविरोधात बलात्कार आणि हुंड्यांविरोधात तक्रार दाखल

कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) बुधवारी सांगितले की, छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने (Actress) तिच्या पतीविरोधात (Husband) तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीवर बलात्कार (Rape) आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.

Karnataka Crime: 'या' अभिनेत्रीची पतीविरोधात बलात्कार आणि हुंड्यांविरोधात तक्रार दाखल
Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) बुधवारी सांगितले की, छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने (Actress) तिच्या पतीविरोधात (Husband) तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीवर बलात्कार (Rape) आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. बसवनगुडी महिला पोलीस ठाण्यात (Basavangudi Women's Police Station) दाखल केलेल्या तक्रारीत फिर्यादीने म्हटले आहे की, लग्नापूर्वी कोरोना लॉकडाऊनमध्ये बाहेर भेटणे शक्य नाही असे सांगून आरोपी तिच्या घरी आला, त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. ती रडत असताना आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि सर्व काही ठीक होईल असे सांगितले. त्यानंतरही आरोपीने अभिनेत्रीशी संमती नसतानाही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

लग्नानंतर तिचा पती, त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच आरोपींनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावाही तिने केला आहे. आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखत होते आणि दोन वर्षांपासून मित्र होते. या अभिनेत्रीने कन्नड रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे आणि ती खूप लोकप्रिय आहे. हेही वाचा  National Family Health Survey: दारु पिण्याच्या प्रकरणांमध्ये बिहार राज्यात वाढ, तर महाराष्ट्रातही 'एवढे' आहे प्रमाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आता तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. आरोपींसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने संघटनांची मदत घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाची माहिती गोळा करत असून तक्रारदाराच्या मित्रांचे जबाबही नोंदवत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2021 10:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).