लखनौ मध्ये काकोरी येथे ATS ची मोठी कारवाई, अल कायदाचे दोन दहशतवाद्यांना पकडल्याचा दावा
त्याचसोबत आजूबाजूच्या घरांना सुद्धा खाली करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एटीएस कमांडोजकडून घराला चहूबाजूंनी घेरले आहे.
Lucknow: राजधानी लखनौ येथील काकोरी परिसरात एटीएसने संशयाच्या आधारावर एका घराला घेराव घातला. त्याचसोबत आजूबाजूच्या घरांना सुद्धा खाली करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एटीएस कमांडोजकडून घराला चहूबाजूंनी घेरले आहे. त्याचसोबत घटनास्थळी बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड यांना सुद्धा बोलावण्यात आले आहे. यामध्ये दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. घरातून मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि दारुगोळा जप्त केला आहे.(हाफिज सईद याच्या घराबाहेर हल्ला केल्याच्या आरोपावर भारताचा पाकिस्तानवर पलटवार, स्वत:चे घर ठिक करण्याचा दिला सल्ला)
खरंतर एटीएसकडून गेल्या काही दिवसांपासून नजर ठेवली जात होती. संशयित हालचालींमुळे एटीएसचा गुप्तहेर नजर ठेवून होता. असे सांगितले जात आहे की, पुष्टी झाल्यानंतर एटीएसने आज ऑपरेशन सुरु केले. ज्या घराला एटीएसने घेरले ते शाहिद नावाच्या व्यक्तीचे आहे. येथे चार संशयित तरुण काही दिवसांपासून येत-जात होते. ज्यामधील दोन जण एटीएसच्या ताब्यात आहेत.(Jammu-Kashmir: सुरक्षाबलाच्या जवानांना मोठे यश, अनंतनाग जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा)
Tweet:
IG जीके गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत दोन प्रेशर कुकर बॉम्ब, टाइम बॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात शस्रे जप्त केली आहेत. माहितीनुसार एटीएसची टीम एका आठवड्यापासून दहशतवाद्यांना ट्रेस करत होती. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांचे सुत अल कायद्यासोबत असल्याचे समोर आले आहे. बॉम्ब विस्फोटक पथकाकडून विस्फोटक निष्क्रिय करण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोन संशयितांना पकडले आहे ते दोघेही पाकिस्तानी हँडलर आहेत.