Saugat-e-Modi Kits: भाजपची गरीब मुस्लिमांना मोठी भेट; Eid al-Fitr निमित्त देशातील 32 लाख लोकांना वाटण्यात येणार सौगात-ए-मोदी किट्स

भाजपची ही मोहीम 25 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथे याला प्रारंभ होईल. याअंतर्गत, प्रत्येक भाजप कार्यकर्ता 100 लोकांशी संपर्क साधेल. भाजपचा दावा आहे की, हे पाऊल सामाजिक समावेशन आणि गरिबी निर्मूलनाच्या दिशेने एक मोठा प्रयत्न आहे.

Saugat-e-Modi Kits: भाजपची गरीब मुस्लिमांना मोठी भेट; Eid al-Fitr निमित्त देशातील 32 लाख लोकांना वाटण्यात येणार सौगात-ए-मोदी किट्स
Eid-1-380x214

भारतीय जनता पक्ष (BJP) ईदनिमित्त (Eid al-Fitr 2025) देशभरातील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना भेट देणार आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाने 'सौगत-ए-मोदी' किट (Saugat-e-Modi Kits) वाटण्याची घोषणा केली आहे. ईदच्या दिवशी मशिदींद्वारे गरजू मुस्लिमांना हे किट वाटले जातील. अल्पसंख्याक आघाडीचे 32,000 पदाधिकारी 32,000 मशिदींशी जोडले जातील. येथून 32 लाख गरजू लोकांची ओळख पटवली जाईल. यानंतर त्यांना ही मदत दिली जाईल. 'सौगात-ए-मोदी' किट्समध्ये खाद्यपदार्थ, कपडे, शेवई, खजूर, सुकामेवा आणि साखर यांचा समावेश आहे. महिलांसाठीच्या किट्समध्ये सूटसाठीचे कापड, तर पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा असतील.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले की, या मोहिमेचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सबका साथ, सबका विकास' हा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे आहे. ​हा उपक्रम रमजान, ईद, गुड फ्रायडे, इस्टर, नौरोज आणि भारतीय नववर्ष यांसारख्या विविध धार्मिक सणांच्या निमित्ताने आयोजित केला जात आहे, ज्यामुळे विविध समुदायांमध्ये ऐक्य आणि बंधुत्व वाढवण्याचा प्रयत्न आहे. आता गरीब मुस्लिमांनाही ईद चांगल्या प्रकारे साजरी करता यावी, म्हणून, भाजप त्यांना हे किट देत आहे.

भाजपची ही मोहीम 25 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथे याला प्रारंभ होईल. याअंतर्गत, प्रत्येक भाजप कार्यकर्ता 100 लोकांशी संपर्क साधेल. भाजपचा दावा आहे की, हे पाऊल सामाजिक समावेशन आणि गरिबी निर्मूलनाच्या दिशेने एक मोठा प्रयत्न आहे. हा उपक्रम बिहारसह अनेक राज्यांमध्ये राबविला जाईल, जिथे भाजपची मजबूत उपस्थिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक किटची किंमत सुमारे 500-600 रुपये असेल. (हेही वाचा: Chhaava in Parliament: संसदेत होणार 'छावा' चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग; PM Narendra Modi यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि खासदार राहणार उपस्थित)

अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी यासिर जिलानी म्हणाले की, 'सौगत-ए-मोदी' योजना ही भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समुदायामध्ये कल्याणकारी योजनांचा प्रचार करणे आणि भाजप आणि एनडीएला राजकीय पाठिंबा मिळवणे या उद्देशाने सुरू केलेली मोहीम आहे. दरम्यान, ​ईद-उल-फितर हा मुस्लिम समुदायाचा एक महत्त्वाचा सण आहे, जो रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजरा केला जातो. रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शनानुसार ईदची तारीख निश्चित केली जाते.​ भारतात, 30 मार्च 2025 रोजी रमजान महिन्याचा 29 वा दिवस आहे. त्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन झाले, तर 31 मार्च 2025 रोजी ईद साजरी केली जाईल. जर चंद्रदर्शन झाले नाही, तर रमजान 30 दिवसांचा पूर्ण होईल आणि 1 एप्रिल 2025 रोजी ईद साजरी केली जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2025 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).