मतदार यादीमधील तुमचे नाव 'या' पद्धतीने शोधा

निवडणुक आयोगाने (Election Commission ) रविवारी देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: निवडणुक आयोगाने (Election Commission ) रविवारी देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर भारतात 543 जागांसाठी लोकसभा निवडणुक लढवली जाणार आहे. त्याचसोबत रविवारपासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक प्रक्रिया ही 4 टप्प्यात होणार आहे. तर 23 मे 2019 रोजी मतदान मोजणी होणार आहे. त्यामुळे आताच तुम्ही मतदानाबद्दल जागृक नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावा. त्याचसोबत जर तुम्हाला तुमचे मतदार यादीमधील नाव पाहायचे असेल तर या पद्धतीने शोधता येणार आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक)

मतदार यादीमधील नाव शोधण्यासाठी निवडणुक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्र ऑप्शन सुरु केला आहे. तेथे तुम्हाला तुमचे नाव आणि मतदान केंद्र कोठे असणार आहे याबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला मतदार यादी पाहाण्यास https://ceo.maharashtra.gov.in/ किंवा http://103.23.150.139/marathi/ या संकेतस्थळावरुन तुम्हाला ही माहिती उपलब्ध होणार आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: व्हीव्हीपॅट यंत्र, APP द्वारा तक्रार, मतदार संख्येत वाढ - पहा लोकसभा निवडणूक 2019 ची '8' वैशिष्ट्य काय?)

तर यंदा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या 90 कोटींच्या घरात आहे. 10 लाख मतदारसंघ असणार आहेत. यंदा मतदानाकरिता व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो असेल.लाऊड स्पीकर रात्री दहा नंतर वापरता येणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement