Bhola Yadav Arrested: लालू प्रसाद यांचे निकटवर्तीय भोला यादव यांना अटक, चार ठिकाणी CBI चे छापे

भोला यादव यांना लँड फॉर जॉब घोटाळा (Land for Job Scam) प्रकरणात अटक झाली आहे.

Bhola Yadav with Lalu Prasad Yadav | (Photo Credit: Archived, edited, representative images)

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे तत्कालीन ओडीएस भोला यादव (Bhola Yadav) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. भोला यादव यांना लँड फॉर जॉब घोटाळा (Land for Job Scam) प्रकरणात अटक झाली आहे. सीबीआयने दिल्लीय येथून आज (27 जुलै) सकाळी त्यांना अटककेली. सीबीआयची कारवाई उशीरपर्यंत सुरु होती. तसेच, यादव यांच्याशी संबंधीत चार ठिकाणी सीबीआयची शोधमोहीम सुरु असून, पटना आणि दरभंगा येथील काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. भोला यादव यांना आज राऊत एवन्यू कोर्टासमोर हजर करण्यात येईल.

भोला यादव हे लालू प्रसाद यादव यांचे 2004 ते 2009 पर्यंत ओएसडी म्हणून कार्यरत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोला यादव या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. सीबीआयने पटना येथील दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. ज्यातील एक भोला यादव यांच्या सीएचा आहे. या शिवाय दरभंगा येथील दोन ठिकाणी शोधमोहीम सुरुच आहे. 18 मे रोजी सीबीआयने या प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मीसा भारती यांच्यासह इतरही काहींविरोधात FIR दाखल केला आहे.

दरभंगा मध्ये भोला यादव यांच्या घरी सीबीआयच्या पथकाने बुधवारी सकाळी छापेमारी केली. सांगितले जात आहे की, माजी आमदारांच्या गंज भैरोपट्टी येथील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने सकाळी सहा वाजता मोहिम सुरु केली. घर बंद असल्याचे पाहताच घराच्या रखवालदाराकडून चावी घेऊन शोधमोहीम राबविण्यात आली. (हेही वाचा, Lakhimpur Violence Case: लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आशिष मिश्राचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार केयर टेकर प्रशांत यांनी म्हटले की, जवळच्या एका कार्यकर्त्याकडे घराची चावी आहे. काही क्षणातच कार्यकर्ता ललीत यादव याला बोलावण्यात आले. ललीत याने घराची चावी उपलब्ध करुन दिली. त्यानंतर पाच सदस्यांच्या एका पथकाने आळीपाळीने घराची झडती घेतली. परंतू, तेथे काहीच भेटले नाही. ही कारवाई साधारणपणे दोन तास चालली. त्यानंतर पथकाने कायदेशीर नियमाने काही कागदपत्रे तयार केली. ज्याची एक प्रत भोला यादव यांच्या कार्कर्त्याला दिली. त्यानंतर आठ वाजता हे पथक परत गेले. विशेष म्हणजे अतिशय गोपनीयता बाळगून केलेल्या या कारवायीची जराशीही माहिती परिसरातील नागरिकांना लागली नाही.