Jaishankar on Kashmir Issue: 'काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला...'; परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे मोठे विधान
जयशंकर यांनी काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला, असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकने आयोजित केलेल्या 'जगात भारताचा उदय आणि भूमिका' या सत्रात ते बोलत होते.
Jaishankar on Kashmir Issue: परराष्ट्र मंत्री (EAM) एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) यांनी बुधवारी काश्मीर खोऱ्यातील प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये कलम 370 रद्द करणे, विकास आणि आर्थिक घटकांची पुनर्स्थापना करणे आणि मोठ्या प्रमाणात मतदान झालेल्या निवडणुका घेणे यांचा समावेश आहे. जयशंकर यांनी काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला, असं महत्त्वपूर्ण विधान लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकने आयोजित केलेल्या 'जगात भारताचा उदय आणि भूमिका' या सत्रात केलं. पाकव्याप्त काश्मीर व्यक्तीरिक्त परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी यावेळी इतर अनेक मुद्द्यांवरही भाष्य केले. यामध्ये चीनशी संबंध, रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत डॉलर चलनाची भूमिका आणि त्याभोवती ब्रिक्स देशांची भूमिका यांचा समावेश होता.
काश्मीरच्या समस्यांबद्दल विचारले असता जयशंकर म्हणाले, 'काश्मीरमध्ये, आम्ही त्यातील बहुतेक समस्या सोडवण्याचे चांगले काम केले आहे. मला वाटते की कलम 370 हटवणे हे एक पाऊल होते. त्यानंतर, काश्मीरमध्ये वाढ, आर्थिक घटक आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे हे दुसरे पाऊल होते. खूप जास्त मतदानासह झालेल्या निवडणुका घेणे हे तिसरे पाऊल होते. मला वाटते की आपण ज्या भागाची वाट पाहत आहोत तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, ज्याच्यावर बेकायदेशीर पाकिस्तानने कब्जा केला आहे. काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला असून पीओके हा शेवटचा टप्पा राहिला आहे, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा- Donald Trump's Swearing-in Ceremony: परराष्ट्र मंत्री S Jaishankar भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील; मंत्रालयाने केली पुष्टी)
Appreciated the conversation with @bronwenmaddox at @ChathamHouse this evening.
Spoke about changing geopolitics, geoeconomics, India-UK ties, neighbourhood and the Indian view of the world.
Do watch 🎥: https://t.co/Wp6CwLBtxY pic.twitter.com/0SSf1E7WuF
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 5, 2025
चीन आणि भारत यांच्यातील अद्वितीय संबंध -
भारताला चीनसोबत कोणत्या प्रकारचे संबंध हवे आहेत? या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, आमचे एक अतिशय वेगळे नाते आहे. जगात एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेले आपण दोनच देश आहोत. आम्हा दोघांचाही इतिहास खूप जुना आहे, ज्यामध्ये कालांतराने चढ-उतार आले आहेत. आज दोन्ही देश प्रगतीपथावर आहेत आणि आपण थेट शेजारीही आहोत. आव्हान असे आहे की जसजसा एखादा देश वाढत जातो तसतसे त्याचे जगाशी आणि त्याच्या शेजाऱ्यांशी असलेले संतुलन बदलते. (Donald Trump साठी पंतप्रधान मोदींचे 'गुप्त पत्र' घेऊन पोहोचले S Jaishankar; शपथविधीनंतर करणार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सुपूर्द)
जयशंकर पुढे बोलताना म्हणाले की, मुख्य मुद्दा हा आहे की स्थिर समतोल कसा निर्माण करायचा आणि समतोलाच्या पुढील टप्प्यात कसे संक्रमण करायचे. आम्हाला असे स्थिर संबंध हवे आहेत जिथे आमच्या हितांचा आदर केला जाईल, आमच्या संवेदनशीलतेला मान्यता दिली जाईल आणि जिथे ते आमच्या दोघांसाठीही काम करेल. हे खरंतर आपल्या नात्यातील मुख्य आव्हान आहे.
भारतासाठी सीमा हा एक महत्त्वाचा पैलू आहे - जयशंकर
भारतासाठी सीमा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या 40 वर्षांपासून, असा विश्वास आहे की संबंध वाढवण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता आवश्यक आहे. जर सीमा अस्थिर असेल, शांत नसेल किंवा शांततेचा अभाव असेल तर त्याचा आपल्या संबंधांच्या विकासावर आणि दिशेने निश्चितच परिणाम होईल.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

