Kangana Ranaut vs BMC: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत केले जाणार नाही, VHP चा निर्णय

अयोध्येतील संत आणि विश्व हिंदू परिषदेने (VHP) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे यापुढे येथे स्वागत केले जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा निर्णय कंगना हिच्या सोबत जे काही घडले त्यावरुन घेतला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- ANI)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने मुंबईला पाकव्याप्त कश्मीरची उपमा दिल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहेच. पण नुकत्याच महापालिकेकडून (BMC) कंगना हिच्या पाली हिल मधील घरासह कमर्शिअल ऑफिसवर हतोडा चालवल्याने आता तिच्या समर्थनार्थ काही जण उतरले आहेत. याच पार्श्वभुमीवर आता अयोध्येतील संत आणि विश्व हिंदू परिषदेने (VHP) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे यापुढे येथे स्वागत केले जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा निर्णय कंगना हिच्या सोबत जे काही घडले त्यावरुन घेतला आहे.

हनूमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी असे म्हटले आहे की, महापालिकेने कंगना रनौत हिचे घर ऑफिस तोडले. त्यामुळे आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले जाणार नाही आहे. ऐवढेच नाही तर उद्धव ठाकरे अयोध्येत आले तर त्यांना कडक विरोधाचा सामना करावा लागेल असे ही त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढे त्यांनी असे ही म्हटले की, अभिनेत्रीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने वेळेचा विलंब न लावता वागले आहेत. मात्र अद्याप सरकारला पालघर मध्ये झालेल्या घटनेच्या संबंधित मारेकऱ्यांवर कारवाई केलेली नाही.(Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रनौतच्या कार्यालयावर महानगरपालिका कारवाई करत आहे, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही - संजय राऊत)

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी असे म्हटले आहे की, शिवसेना जाणूनबुझून अभिनेत्रीला निशाणा बनवत आहेत. तर तिने नॅशनल फोर्सेसला पाठिंबा देत आहे. त्याचसोबत मुंबईतील ड्र्ग्ज माफियांच्या विरोधात तिने आवाज उठवला आहे. त्यांनी असे ही म्हटले की, महाराष्ट्र सरकार दुर्दैवी वृत्तीने कंगनाच्या विरोधात असे वागत आहेत.

महंद कन्हैया दास हे अयोध्या संत समाजाचे प्रमुख आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारवर जे समाजकंटक कामात गुंतले आहेत त्यांचे संरक्षण करत असल्याचा आरोप ही केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्याविषयी चेतावणी सुद्धा दिली आहे.(Bhagat Singh Koshyari Express Displeasure To CM Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर राज्यपालांचा आक्षेप)

तर आता उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत केले जाणार नाही आहे. शिवसेना कंगनावर का निशाणा साधत आहे? सर्वांना समजू शकते. हे काही गूढ नाही आहे. पुढे महंत कन्हैया दास यांनी असे ही म्हटले की, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी सारखी आता शिवसेना राहिलेली नाही.

उद्धव ठाकरे यांनी 24 नोव्हेंबर 2018 मध्ये अयोध्येत दौरा केला होता. त्यानंतर गेल्या वर्षात 16 जूनला आणि या वर्षात मार्च महिन्यात उद्धव ठाकरे अयोध्येत आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now