'हम दो.. हमारे दो': केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांचा Rahul Gandhi यांना दलित मुलीशी लग्न करण्याचा सल्ला; जाणून घ्या काय म्हणाले 

त्यांनी म्हटले होते की देशात सर्व काही फक्त 'हम दो, हमारे दो' साठी केले जात आहे. राहुल गांधी यांच्या विधानावर आठवले यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांना एक सल्ला दिला आहे

Ramdas Athawale | (Photo Credits: Twitter)

कॉंग्रेसचे खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर, 'हम दो..हमारे दो' (Hum do, Humare do) अशी घोषणाबाजी करत हल्लाबोल करत आहेत. त्यांनी हे वाक्य अनेक मेळाव्यात वापरले आहे. परंतु, आज या घोषणाबाजीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी त्यांच्या मिश्कील शैलीत उत्तर दिले. इतकेच नाही तर त्यांनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्लाही दिला. रामदास आठवले हे त्यांच्या हास्य कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी राहुल गांधीच्याबाबत केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे.

राहुल गांधींनी संसदेत नुकत्याच दिलेल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की देशात सर्व काही फक्त 'हम दो, हमारे दो' साठी केले जात आहे. राहुल गांधी यांच्या विधानावर आठवले यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांना एक सल्ला दिला आहे. केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, ‘हम दो, हमारे दो’ घोषणा कुटुंब नियोजनासाठी वापरली जात आहे. जर त्यांना याचा (राहुल गांधी) प्रचार करायचा असेल, तर त्यांनी लग्न केले पाहिजे. त्यांनी दलित मुलीशी लग्न केले पाहिजे आणि महात्मा गांधींचे जातीयवाद हटविण्याचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. जे तरुणांना प्रेरणा देऊ शकते.’

11 फेब्रुवारी रोजी संसदेत भाषण करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणे मारताना म्हटले होते की, ‘एकेकाळी ‘हम दो, हमारे दो’ गोंडस लोगो असायचा, ज्यामध्ये प्रेमळ चेहरे होते. आता देशात सर्व काही 'हम दो, हमारे दो' साठी केले जात आहे. आज चार लोक देश चालवत आहेत. पंतप्रधान 'हम दो हमारे दो’ या तत्त्वावर देश चालवत आहोत. 'हम दो, हमारा दो' या घोषणेला या सरकारने नवा अर्थ दिला आहे.’ गांधी यांच्या या भाषणावर आठवले यांनी त्यांना दलित मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. (हेही वाचा: Farmer's Protest: काँग्रेस नेत्या विद्या देवी यांची जीभ घसरली; शेतकरी आंदोलनावर केले असे वादग्रस्त वक्तव्य)

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मी शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांना एनडीएत जाण्याचे आवाहन केले आहे. जर त्यांनी तसे केले तर येथे भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असेल. यातून त्यांना दिल्लीतही सत्ता मिळू शकते. याचा उपयोग झारखंडच्या विकासासाठी होऊ शकतो. त्यांनी त्याबद्दल विचार केला पाहिजे.’