Government Employees and RSS Activities: आता आरआरएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारीदेखील होऊ शकतात सहभागी; केंद्र सरकारने हटवली 58 वर्षे जुनी बंदी
केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर 1966 रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती. आता मोदी सरकारने ही 58 वर्षे जुनी बंदी उठवली आहे. या आदेशाने केंद्र सरकारने जारी केलेल्या 1966, 1970 आणि 1980 च्या आदेशांमध्ये सुधारणा करण्यात आली.
Government Employees and RSS Activities: आता केंद्रीय कर्मचारीही (Central Employees) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांवर आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरील बंदी केंद्र सरकारने आता उठवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात केंद्र सरकारची ही भेट मानली जात आहे. संघाच्या स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या केंद्र सरकारच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना निर्बंधांमुळे सहभागी होता येत नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही हा कायदा लागू होता. आता हे निर्बंध हटवल्यामुळे सरकारी कर्मचारी आरएसएस कार्यक्रमात सामील होऊ शकतील.
केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर 1966 रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती. आता मोदी सरकारने ही 58 वर्षे जुनी बंदी उठवली आहे. या आदेशाने केंद्र सरकारने जारी केलेल्या 1966, 1970 आणि 1980 च्या आदेशांमध्ये सुधारणा करण्यात आली, ज्यामध्ये काही इतर संस्थांसह आरएसएसच्या शाखा आणि इतर क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई आणि दंडात्मक तरतुदी लादल्या गेल्या होत्या. आरएसएसच्या कार्यात सहभागी असल्यास कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूदही लागू करण्यात आली होती.
मात्र, दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी हा आदेश रद्द केला होता, परंतु केंद्र सरकारच्या पातळीवर हा आदेश कायम होता. आता 9 जुलै 2024 रोजी 58 वर्षांची बंदी उठवण्यात आली. हा आदेश भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने जारी केला आहे. या आदेशावर भारत सरकारच्या उपसचिवांची स्वाक्षरी आहे. (हेही वाचा: Karnataka IT Firms Propose 14-hour Workday: कर्नाटकमध्ये आयटी कामगारांचे कामाचे तास 14 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव; कर्मचारी संघटनेचा विरोध)
दरम्यान, काँग्रेसने या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी कार्यालयीन निवेदन शेअर करताना सांगितले की, ‘फेब्रुवारी 1948 मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. त्यानंतर चांगल्या आचरणाच्या आश्वासनावर ही बंदी उठवण्यात आली होती. यानंतरही सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. आरएसएसने नागपुरात कधीही तिरंगा फडकवला नाही.’
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)