GDP मध्ये सुधारणा; चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 7.5 टक्के घट, एप्रिल-जूनमध्ये 23.9 टक्क्यांटी दिसली होती घट
कोरोनाच्या व्हायरसची परिस्थिती असली तरीही देशाची अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. देशातील GDP चालू असलेले आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत 7.5 टक्क्यांची घट दिसून आली आहे. ती पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून मध्ये 23.9 टक्के घटच्या तुलनेत कमी आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचे आकडे 27 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहेत.(Bribery In India: लाचखोरीच्या बाबतीत भारत आशियामध्ये पहिल्या स्थानावर; मालदीव आणि जपानमध्ये लाच घेण्याचे प्रमाण सर्वात कमी)
कोरोनाच्या काळात देशातील जीडीपी सातत्याने दुसऱ्या तिमाहिती घटल्याचे दिसून आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोंबर मध्ये आठ प्रमुख क्षेत्रातील उत्पादन 2.5 टक्के घटले आहे. तर पहिल्या तिमाहिती जीडीपी 23.9 टक्के घटल्याचे दिसून आले आहे. कोरोना मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणास्तव अर्थव्यवस्था हळूहळू पुन्हा रुळावर येणे आवश्यक आहे.(NASA Alert: चिंताजनक! वर्षाअखेरीस अंतराळातून पृथ्वीवर येणार आणखी एक संकट; नासाकडून इशारा)
पंतप्रधान यांचे पीएमईएसीच्या अंशकालिन सदस्य नीलेश शहा यांनी मंगळवारी असे म्हटले की, चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरच्या तिमाहीत जीडीपी मध्ये घट ही पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कमी असणार आहे.
कोरोना व्हायरस आणि त्याचा प्रसार वाढू नये म्हणून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मुळे चालू आर्थिक वर्षात 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून मध्ये जीडीपी 23.9 टक्के घटला आहे. त्याच्या आधारावर संपूर्ण आर्थिक वर्षात 14 टक्के घट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, लॉकडाऊन संबंधित नियम हटवल्यानंतर आर्थिक गोष्टी सुरु झाल्याने स्थिती सुधारली आहे. हेच पाहता आरबीआयने जीडीपीमध्ये 2020-21 मध्ये 9.5 टक्के घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
रेटिंग एजेंसी इक्रानने नुकत्याच एका रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, वर्षभराच्या आधारावर जीडीपी मदअये 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत घट पहिल्या तिमाहीच्या तुलनेत घट होत 9.5 टक्के राहील अशी अपेक्षा आहे. जीवीए मध्ये घट 8.5 टक्क्यांची शक्यता तर पहिल्या तिमाहीत यामध्ये 22.8 टक्के घट झाली होती.
इक्राच्या रिपोर्टनुसार, जीवीए मध्ये घट झाल्यामागील कारण उद्योग, विनिर्माण आणि निर्माण किंवा सेवा क्षेत्रांमधील पहिल्या तिमाहीच्या तुलनेतील सुधार आहे. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत उद्योग 9.3 टक्के घटची शक्यता आहे. जी पहिल्या तिमाहित 38.1 टक्के होती. विनिर्माण आणि निर्माण क्षेत्रातील प्रदर्शनातील सुधारामुळे जीवीए मध्ये घट कमी झाली आहे. सेवा क्षेत्रात 10.2 टक्के घटची शक्यता आहे. तर पहिल्या तिमाहीत मध्ये यामध्ये 20.6 टक्क्यांची घट आली होती.