First Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल
सब लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाचे डॉर्नियर सर्व्हेलंस विमान चालवणार आहेत
सब लेफ्टनंट शिवांगी (Sub Lieutenant Shivangi) सोमवारी कोची नौदल तळावर कार्यरत असणाऱ्या भारतीय नौदलाच्या पहिली महिला पायलट (First Woman Pilot) झाल्या. सब लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाचे डॉर्नियर सर्व्हेलंस विमान चालवणार आहेत. एझीमला इंडियन नेव्हल अॅकॅडमीमध्ये 27 NOC कोर्सचा भाग म्हणून त्यांना SSC (पायलट) म्हणून भारतीय नौदलात घेण्यात आले आणि गेल्या वर्षी जूनमध्ये Vice Admiral ए.के. चावला यांनी औपचारिकपणे त्यांची नेमणूक केली. सब लेफ्टनंट शिवांगी बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी आहेत.
माध्यमांशी बोलताना शिवांगी म्हणाल्या, 'मी बऱ्याच काळापासून या क्षणाची प्रतीक्षा करत होते आणि आता मला ते मिळाले. ही एक चांगली भावना आहे. मी माझे तिसरे प्रशिक्षण पूर्ण करण्याची अपेक्षा करीत आहे.' शिवांगी यांनी डीएव्ही पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी दक्षिणी नेव्हल कमांड येथे प्रशिक्षण घेतले आहे. शिवांगी यांचे विमान प्रशिक्षण तीन टप्प्यात घेण्यात आले.
त्यांनी भारतीय वायुसेनेकडे (IAF) सहा महिन्यांचे मूलभूत उड्डाण प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पायलट होण्यासाठी डॉर्नियर उड्डाण केले. डेक्कन हेराल्डने याबाबत माहिती दिली आहे. Naval Academy सहा महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर, त्यांनी उड्डाण प्रशिक्षण डुंडीगलच्या Air Force Academy येथे Pilatus (PC7) विमानाने सुरू झाले. त्यांनी कोची येथे डॉर्नियर प्रशिक्षण पथक आयएनएएस 550 कडून 07 डॉर्नियर रूपांतरण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. (हेही वाचा: विदेशी योगदान नियमन कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर, पाहा काय आहे Foreign Contribution (Regulation) Amendment)
भारतीय नौदलाच्या विमान सेवांमध्ये सामील होण्यापूर्वी, शिवांगी सैन्याच्या विमान वाहतूक शाखेत हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिला आणि संवाद व शस्त्रे यासाठी जबाबदार असलेल्या विमानात 'निरीक्षक' म्हणून काम करणाऱ्या महिला अधिकारी आहेत.
दरम्यान, डॉर्नियर (DO-228) विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HCL) निर्मित आहे. एचएएल डीओ -228 विमान हे भारताचे हलके सागरी पाळत ठेवण्याचे विमान आहे. शुक्रवारी, नेव्हीने गुजरातच्या पोरबंदरमधील नेव्हल एअर एन्क्लेव्ह येथे झालेल्या समारंभात एअर स्क्वॉड्रॉन 314 सुरू केले.