Tax Refunds Surge in FY 2024-25: आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर परताव्यात 46% वाढ; केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहती

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 46.31 टक्के वाढ झाली आहे.

Tax Refunds | (Photo credit: archived, edited, representative image)

Income Tax Updates: आर्थिक वर्ष 2024-25 साठी (Financial Year 2024-25) कर परतावा वितरणात लक्षणीय सुधारणा झाली असून 1 एप्रिल ते 27 नोव्हेंबर दरम्यान 3.08 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. करपरताव्यामध्ये पाठीमागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 46.31 टक्के वाढ (Tax Refunds Surge in FY 2024-25) झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) दिली आहे. मंत्रालयाने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) पोर्टलच्या विक्रमी कामगिरीवर प्रकाश टाकताना म्हटले की, विभागाने, कामाच्या वेगाच्या अच्युच्च शिखरावर प्रति सेकंद 900 पेक्षा जास्त फाईलिंग हाताळल्या आणि मूल्यांकन वर्षासाठी (A.Y.) एकाच दिवसात 1.62 कोटी आयटीआरवर प्रक्रिया केली. 2024-25 च्या दरम्यान. 31 जुलै 2024 रोजी, एकाच दिवसात 69.93 लाख आयटीआर दाखल करण्यात आले, 22 नोव्हेंबरपर्यंत एकूण 8.50 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले, जे 2023 च्या याच कालावधीच्या तुलनेत 7.32% जास्त आहे.

अयशस्वी कर परतावा प्रकरणांवर विशेष लक्ष्य

अर्थमंत्रालयाने सांगितले की, पूर्वीच्या मूल्यमापन वर्षातील अयशस्वी झालेल्या 35 लाख परताव्याच्या प्रकरणांवर लक्ष्य केंद्रीत करून, एक विशेष उपक्रम राबवला गेला. ज्यामुळे प्रमाणित बँक खात्यांना त्यांची देय रक्कम मिळाली याची खात्री केली गेली. या उपाययोजनांमुळे प्रलंबित परतावा देण्यास लक्षणीय गती मिळाली आणि एकूण कर प्रशासन प्रक्रिया सुव्यवस्थित झाली. (हेही वाचा, 8th Pay Commission: आठव्या पे कमिशन चा सध्या विचाराधीन नसल्याची Finance Ministry ची माहिती - रिपोर्ट्स)

तुलनात्मक कामगिरी

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या वर्षीचा मैलाचा दगड गाठण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे कार्यक्षमता सुधारण्यासाठी सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित होते, असेही केंद्राने म्हटले. पुढे बोलताना सरकारने सांगितले की, आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच कालावधीत 2.03 लाख कोटी रुपयांचा परतावा वितरित करण्यात आला. (हेही वाचा, ITR भरण्यास मुदतवाढ? आयकर विभागाने काय म्हटले? वासा सविस्तर)

तंत्रज्ञानाची भूमिका आणि टीआयएन 2.0 मंच

आयटीआर भरताना नागरिकांना सुलभता यावी यासाठी तंत्रज्ञानाचा विशेष प्रयत्न करण्यात आला. ज्यामध्ये टीआय मंचाची महत्त्वाची भूमिका राहील. सरकारने म्हटले आहे की, टीआयएन 2.0 मंचाची ओळख परिवर्तनशील आहे. या मंचाद्वारे 0.002% इतक्या कमी त्रुटी दरासह 3 कोटींहून अधिक परतावे जमा करण्यात आले. या तांत्रिक प्रगतीमुळे करदात्यांसाठी तरलता वाढली आहे आणि कर प्रशासन प्रणालीवरील विश्वास दृढ झाला आहे.

आयकर परतावा वितरणात लक्षणीय वाढ झाल्याने वैयक्तिक करदात्यांना आणि व्यवसायांना फायदा होईल, आर्थिक दिलासा मिळेल आणि आर्थिक घडामोडींना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर सरकारचे लक्ष केंद्रित केल्याने करदात्यांच्या सेवा आणि प्रशासन वाढवण्याची अधिक शक्यता आहे. टीआयएन 2.0 च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे, येत्या काही वर्षांत आपली कामगिरी टिकवून ठेवणे आणि कर प्रशासनात आणखी सुधारणा करणे हे अर्थ मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.