Farmers Protest: सरकारने जर हा काळा कायदा मागे न घेतल्यास राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार परत करणार- बॉक्सर विजेंदर सिंह
यावेळी त्याने शेतकऱ्यांसोबत बातचीत ही केली.
Farmers Protest: कृषि बिलाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आज 11 व्या दिवशी ही राजधानी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. सरकारसह शेतकऱ्यांच्या बैठका सुद्धा होत आहेत. मात्र कोणताही तोडगा न निघाला नाही आहे. याच दरम्यान, 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अन्य पक्षांनी सुद्धा या बंदच्या हाकेला समर्थन दिले आहे. याच दरम्यान, बॉक्सर विजेंदर सिंह (Vijender Singh) हा शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सिंघु बॉर्डरवर पोहचला. यावेळी त्याने शेतकऱ्यांसोबत बातचीत ही केली.
कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी विजेंदर सिंह सिंघु बॉर्डवर पोहचले. विजेंदर सिंह याने असे म्हटले की, जर सरकारने हा काळा कायदा मागे न घेतल्यास मी सरकारला माझा खेळातील सर्वाधिक मोठा पुरस्कार राजीव गांधी खेल रत्न परत देईन.(Bharat Bandh: कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून येत्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक)
Tweet:
मी पंजाबमध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्यांचा 'रोटी' घेतला असता. आज जेव्हा ते इथे थंड आहेत, तेव्हा मी त्यांचा भाऊ म्हणून आलो आहे. हरियाणामधील इतर खेळाडूंना यायचे होते पण त्यांना शासकीय नोकर्या मिळाल्या आहेत आणि अडचणीत सापडले असते. ते म्हणतात की ते शेतकर्यांसोबत आहेत असे ही विजेंदर सिंह याने म्हटले आहे.(Farmers Protest: गैरसमजपणे आंदोलन करणे योग्य नसून हा कायदा हितकारक- रामदास आठवले)
Tweet:
तर 8 डिसेंबरला देण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेबद्दल आता विधाने केली जात आहेत. त्याचसोबत 9 डिसेंबरला केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये एक बैठक पार पडणार असून त्याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसने या बंद बद्दल असे म्हटले की, शेतकऱ्यांच्या हितासाठीच याला पाठिंबा देणार आहोत. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.