IndiGo Flight Emergency Landing: मुंबई-गुवाहाटी इंडिगो फ्लाइटचे ढाका येथे आपत्कालीन लँडिंग
मुंबईहून (Mumbai) गुवाहाटीला (Guwahati) जाणाऱ्या इंडिगो विमानाचे (IndiGo Flight Emergency Landing) बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
मुंबईहून (Mumbai) गुवाहाटीला (Guwahati) जाणाऱ्या इंडिगो विमानाचे (IndiGo Flight Emergency Landing) बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दाट धुक्यामुळे गुवाहाटी विमानतळावर विमानाच्या उतरण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ही घटना शनिवारी (13 जानेवारी) घडली. मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सूरजसिंग ठाकूर यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव कथन करताना ही घटना घडली. ठाकूर हे विमानातील प्रवासी होते. त्यांनी सोशल मीडियावर कथन केलेल्या माहितीनुसार, 6E 5319 नावाच्या IndiGo6E फ्लाइटला दाट धुक्यामुळे आव्हानांना सामोरे जावे लागले, परिणामी गुवाहाटीऐवजी ढाका येथे उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.
दाट धुक्यामुळे विमान ढाक्याला
सूरजसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, "मी मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठी IndiGo-6E फ्लाइट 6E 5319 ने घेतले. पण दाट धुक्यामुळे ते फ्लाइट गुवाहाटीमध्ये उतरू शकले नाही. त्याऐवजी ते ढाक्याला उतरले," त्यांनी लिहिले, फ्लाइटमधील सर्व प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्टशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. प्रवासी बराच काळ विमानातच थांबून राहिल्याने ठाकूर यांनी निराशा व्यक्त केली. तसेच, ही परिस्थीती जवळपास नऊ तास तशीच राहिल्याचेही म्हटले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी ते मणिपूर (इंफाळ) येथे जात होते, असे त्यांनी सांगितले. ठाकूर यांनी सोशल मीडियावर दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले की, मी 9 तासांपासून विमानात अडकलो आहे. भारत जोडो न्याय यात्रेसाठी मी मणिपूर (इंफाळ) येथून निघालो आहे. मी गुवाहाटीला कधी पोहोचतो ते पाहू आणि नंतर इम्फाळला उड्डाण करेन. (हेही वाचा -Window Seat Cushion Missing In IndiGo Flight: इंडिगो पुणे-नागपूर फ्लाइटमध्ये विंडो सीटचे कुशन गहाळ, See Photo)
आपत्कालीन स्थितीत आपत्कालीन लँडींग
वातावरणातील बदल, घटलेली दृश्यमानता, अतिरेकी हल्ला, अपहरण, हल्ल्याचा संशय, तांत्रिक बिघाड, विमानातील प्रवाशाला उद्भवलेली आपत्कालीन स्थिती (जसे की, बाळंतपण, हार्ट अॅटेक वगैरे), इंधन यांसारख्या बाबी विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यास कारणीभूत मानली जातात. आपत्कालीन स्थितीमध्ये विमानाचे लँडींग करण्यासाठीही काही संकेत आहेत. या संकेत आणि नियमांचे पालन करुनच विमानांचे लँडींग केले जाते. आपत्कालीन लँडींग हा विमानातील प्रवाशांच्या जीवाशी निगडीत अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे त्यासोबत कोणताही धोका पत्करला जात नाही. (हेही वाचा, Mumbai-Chennai IndiGo Flight Delay: को-पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याने चेन्नईहून मुंबईकडे जाणार्या इंडिगो फ्लाइटला 4 तासांचा विलंब; प्रवाशांमध्ये संताप)
विमनांचे आपत्कालीन लँडींग ही बाबत तशी नवी राहिली नाही. अलिकडील काळात विमानांच्या आपत्कालीन लँडींगचे प्रमाण वाढले आहे. अर्थात, विमानांना आपत्कालीन लँडींग करावे लागू नये यासाठी सर्वच विमान कंपन्या आपापल्या विमानांची देखभाल दुरुस्ती आणि इतर बाबींची काळजी घेतात. परंतू, नैसर्गिक संकट, दृश्यमानता यांसारख्या बाबी पायलट आणि विमान कंपन्यांच्या हातात नसतात. परिणामी काही वेळा आपत्कालीन लँडींग करावे लागते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)